*काश्मीरमध्ये अनुभवला माणुसकीचा झरा – गुरुबाळ माळी*
काश्मीर एक नजराणा पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर दि. 19
काश्मीर हा पृथ्वीवरील स्वर्ग असून महापुराच्या थरारक काळात माणुसकीचा अखंड झरा अनुभवला असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांनी केले. काश्मीर एक नजराणा या डॉ. सुनिल पाटील लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
काश्मीर हा भारताचा मानबिंदू असलेले राज्य आहे पण गतकाळातील काही अप्रिय घटनांमुळे आपण तिकडे पाठ फिरवणे योग्य नाही असेही ते पुढे म्हणाले.
याप्रसंगी बोलताना लेखक डॉ. सुनिल पाटील यांनी चाळीस वर्षांपूर्वीचा काश्मीर प्रवास व त्यानंतर लिहिलेल्या आठवणींच्या गाठोड्यातून निर्माण झालेले अभूतपूर्व पुस्तक तब्बल चाळीस वर्षानंतर कसे प्रकाशित झाले याचा खुमासदार अनुभव सांगितला.
काश्मीर हा अनमोल अनुभवांचा खजिना असून सर्वांनी आयुष्यात एकदातरी काश्मीर पर्यटन करावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी केले.
याप्रसंगी आयुर्वेल प्रकाशनाच्या प्रकाशिका सौ. सुजाता पाटील, डॉ. बी. जी. पाटील, अरुण काशीद, डॉ. आदित्य काशीद, डॉ. प्रणव पाटील, डॉ. शरयू काचोळे – पाटील, निशिकांत चाचे, संजय कात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभार डॉ. ऋषिकेश जाधव यांनी मानले.