कोल्हापूर मेडिकल असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय व्यसनमुक्ती अभियान* डीवायपी पॉलीमध्ये अभियानाची सुरुवात

Spread the news

*कोल्हापूर मेडिकल असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय व्यसनमुक्ती अभियान*
डीवायपी पॉलीमध्ये अभियानाची सुरुवात

 


डॉ.डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक ,कसबा बावडा येथे कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हा पातळीवरील व्यसनमुक्ती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला व्यसनमुक्ती तज्ञ डॉ.अविनाश उपाध्ये यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामाबद्दल माहिती दिली.
डॉ.उपाध्ये म्हणाले, व्यसन ही आता सामाजिक समस्या बनत चालली आहे. अगदी सहजपणे युवा पिढी व्यसनाच्या अधीन होत आहे. त्यामुळे याबाबत जागरूकता होणे गरजेचे आहे.

  •  

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर.एम. कुलकर्णी यांनी सांगितले की, व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक त्रासातून युवा पिढीला वाचवण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. संपूर्ण जिल्हाभर हे अभियान राबवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. डॉ. संदीप पाटील यांनी व्यसन ही फॅशन होत असून त्यापासून विद्यार्थी दशेत प्रयत्नपूर्वक लांब राहायला हवं, असे नमूद केले.

विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती सारख्या विषयाची माहिती योग्य टप्प्यावर मिळण्यासाठी केएमए ने हाती घेतलेले हे अभियान कौतुकास्पद आहे असे प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी सांगितले.

आभार केएमए सेक्रेटरी डॉ. अरुण धुमाळे यांनी मानले.
डॉ .आदित्य कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सौ.उपाध्ये, उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके,सर्व विभागप्रमुख आणि स्टाफ,विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा.राज अलासकर यांनी सुत्रसंचालन केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!