श्री वसंतराव चौगुले पतसंस्थेची १००० कोटी व्यवसायाकडे वाटचाल

Spread the news

श्री वसंतराव चौगुले पतसंस्थेची १००० कोटी व्यवसायाकडे वाटचाल
कोल्हापूर : श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात उल्लेखनिय आर्थिक प्रगती
साध्य करत संस्थेने सभासद ठेवीदार यांच्या मदतीने गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एका दिवासात १७ कोटी
इतक्या ठेवी गोळा करुन सहकार क्षेत्रामध्ये आदर्श निर्माण केला आहे. संस्थेने ५०० कोटी ठेवींचे लक्ष ठेवून
२३ शाखांव्दारे अविरत सेवा देत संस्थेने ठेवी ३६० कोटी, कर्ज २५७ कोटी, व गुंतवणूक ११० कोटी असा
७२७ कोटींचा संमिश्र व्यवसाय केलेला आहे.
संस्थने बँकींग क्षेत्रामध्ये कोअर बँकींग प्रणालीचा उपयोग करुन सभासद व ग्राहकांचे हीत
साधले आहे. बँकींग व्यवसायाबरोबरच संस्था RTGS, NEFT, वेस्टर्ण मनी ट्रान्सफर, क्यू आर कोडव्दारे
संस्थेच्या कोणत्याही शाखांमध्ये रक्कम जमा करण्याची सोय, सर्व शाखामध्ये वीज बील वसुली केंद्रे, सर्व
शाखामध्ये लॉकर्स अशा सुविधा देऊन सभासद व ग्राहकांचे आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. सभासद व
ग्राहकांच्या साथीने संस्थेने चांगली प्रगती केली आहे. संस्थेचा ऑडिट वर्ग सतत अ असून संस्था प्रतिवर्षी
सभासदनां लाभांश देत आहे. असे सांगतानाच सर्व शाखा स्वमालकीच्या असल्यामुळे संस्थेची स्थिती भक्कम
असल्याचे संस्थेचे चेअरमन मा.अनिल पाटील यांनी सांगितले. यावेळी व्हा.चेअरमन मा. श्रीकांत नागवेकर,
मा. मनिष चौगुले, मा. सुमित चौगुले, संचालक मा. प्रविण पाटील, मा. अमरनाथ गाताडे, मा. अभिजीत
मणियार, मा.अरुण बहिरशेट, मा. बाजीराव रावण, मा. विनित सरगर, मा. बाबुराव कांबळे, सौ. मनिषा
कुलकर्णी व असि.जनरल मॅनेजर मा. तुकाराम द. पाटील, मा.शशिकांत मोरे, मा.वसंतराव चव्हाण, बोर्ड
सेक्रेटरी कुंतिनाथ शेटे, संगणक व्यवस्थापक राजेंद्र कोळी आदी उपस्थित होते

  1. U­

 



Spread the news

You may also like

error: Content is protected !!