एक एप्रिलपासून गाय दूध खरेदी दरात वाढ… राज्याचा दूध महासंघ म्हणून गोकुळची ओळख निर्माण करू… – मा.नाम.हसन मुश्रीफसो

Spread the news

 

 


एक एप्रिलपासून गाय दूध खरेदी दरात वाढ…

  •  

राज्याचा दूध महासंघ म्हणून गोकुळची ओळख निर्माण करू…

– मा.नाम.हसन मुश्रीफसो

वैद्यकीय शिक्षण मंत्री

‘गोकुळ’ च्या माध्यमातून दूध उत्पादकांना नेहमीच न्याय देण्याची भूमिका

– आमदार सतेज पाटील

माजी गृहराज्यमंत्री

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोकुळ पेट्रोल पंप उद्‌घाटन, विविध बक्षीस वितरण, सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरीचे अनावरण शुभारंभ सोहळा संपन्न

 

कोल्हापूर, ता.३०: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोकुळच्या नवीन पेट्रोल पंपाचे, सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरीचे उद्‌घाटन व ‘गोकुळ श्री’ स्पर्धेतील विजेत्यांना तसेच विविध बक्षीस वितरण खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ तसेच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते व आघाडीचे नेते, संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत रविवार दि.३०/०३/२०२५ इ.रोजी गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला.

यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळने दूध उत्पादकांच्या हिताचे अनेक निर्णय घेवून दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सौर उर्जा प्रकल्प, हर्बल पशुपूरक प्रकल्प, स्लरी प्रकल्प, वाशी (मुंबई) येथे दुग्ध शाळेचे विस्तारीकरण असे महत्वकांशी व संघ हिताचे प्रकल्प राबविण्यामध्ये यशस्वी झालो असून संघाने दूध वाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबविला. आपण सर्वांनी प्रयत्न करून गेल्या वर्षामध्ये चांगल्या पद्धतीचं संकलन केलं आणि आपण १९ लाख लिटर पर्यंत पोहोचलो असून संघाच्या विविध योजना राबवून गोकुळचा २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा दूध उत्पादकांच्या सहकार्याने निश्चीतच पार पाडू असा विश्वास व्यक्त केला. गोकुळ देशातील सगळ्यात चांगला ब्रँड बनवून गोकुळच्या नावावरच राज्याची दूध विक्री व्हावी व राज्याचा दूध महासंघ म्हणून गोकुळची ओळख निर्माण करण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्नशील राहू.

यावर्षी गाय दूध पावडर आणि बटरला चांगले बाजारपेठ मिळाल्यामुळे गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना १ एप्रिल पासून गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपये वाढ प्रतिलिटर २० पैसे जादा दूध दरफरक व संघाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने प्राथमिक दूध संस्थांना जाजम (जमखाना) व घड्याळ तसेच संघ कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले

यावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो म्हणाले कि, चार वर्षात दूध खरेदी दरात अकरा रुपयांची वाढ केली आहे. गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून दूध उत्पादक हिताचा कारभार करत आहे. गेल्या चार वर्षात दूध खरेदी दरात अकरा रुपयांची दरवाढ केली. गोकुळला मिळणाऱ्या एक रुपया उत्पन्नातील ८५. ६८ पैसे इतका परतावा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिला जातो. जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ दूध संघ या संस्था राजकारण विरहित आहेत. यावर लाखो लोकांचे जीवन अवलंबून आहे. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्याना, दूध उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका आहे.’

यावेळी बोलताना आमदार चंद्रदीप नरके म्हणाले कि, अलीकडच्या काळामध्ये दुधाचा उद्योग हा खऱ्या अर्थाने कुटुंब चालवायला आणि मुख्य व्यवसाय म्हणून केला जात असून दुग्ध व्यवसायाला गती देण्याचे काम गोकुळने केले आहे. गोकुळ मध्ये चांगल्या पद्धतीने कारभार चालू असून दुध उत्पादकांना अधिकाधिक दर देण्याच्या दृष्टीने सौर उर्जेसारखा चांगले उपक्रम राबविले जात आहेत हे कौतुकास्पद असल्याचे मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले कि, खासदार शाहू महाराज यांनी गोकुळ दूध संघ हा साऱ्यांना बरोबर घेऊन वाटचाल करणारा संघ आहे. विविध पक्षाचे लोक येथे एकत्रितपणे शेतकऱ्यासाठी काम करत असल्याचे चित्र आहे.’गोकुळचे सहकारातील कार्य चांगले असल्यामुळेच दूध उत्पादकांना दुधाचा दर सातत्याने चांगला मिळत आहे.

यावेळी प्रास्‍ताविक भाषणामध्ये बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळने सर्व संचालक मंडळ व नेते मंडळीच्या मार्गदर्शना खाली अनेक प्रकल्प राबविले असून त्यानुसार गोकुळने पेट्रोल पंप सुरु केला आहे. हा पेट्रोल पंप गोकुळशी संबंधित सर्वांसाठीच फायदेशीर ठरणार आहे. तसेच संघामार्फत स्थापन केलेल्या वैरण बँकेकडे सायलेज बेलर व हार्वेस्टर मशीनद्वारे तयार होणारे सायलेज मार्केट मधील इतर सायलेज पेक्षा निश्चितच गुणवत्तापूर्ण व स्वस्तही असेल त्यामुळे मार्केटमधील सायलेजच्या दरवाढीस आळा बसेल परिणामी पशुपालकांचा दूध व्यवसाय सोपा, फायदेशीर व आधुनिक बनण्यास मदत होईल. जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असल्याचे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमावेळी सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यास्तरीय तसेच तालुकास्तरीय गाय / म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा, म्हैस उत्तम प्रत दूध पुरवठा, महिला दूध संस्था, तसेच जास्‍तीत-जास्‍त दूध विक्री करणा-या दूध वितरकांचाही सत्‍कार व बक्षीस वाटप तसेच स्लरी धनादेश, हिरक महोत्सवी भेटवस्तू वाटप उपस्थितीत मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमावेळी कोल्हापूर मध्ये सर्किट बेंच मंजूर करण्याचा ठराव सर्वानुमते सहमत करण्यात आला.

तसेच मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली, या कार्यक्रमाचे स्‍वागत संघाचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांनी केले, तर आभार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.

यावेळी याप्रसंगी खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, भारत पेट्रोलियमचे अजय रोके व जिल्ह्यातील दूध संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

————————————————————————————————————-

फोटो ओळ- गोकुळ श्री स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देताना खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार के.पी.पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील आदि दिसत आहेत.

———————————————————————————————————–


Spread the news

You may also like

error: Content is protected !!