कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री [ सीआयआय ] पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी ऋषि कुमार बागला , उपाध्यक्षपदी वीर अडवाणी यांची निवड
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री [ सीआयआय ] पश्चिम विभागासाठी २०२५-२६ चे नवे नेतृत्व जाहीर करण्यात आले.
बी जी इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स इंडिया चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषि कुमार बागला यांची सीआयआय पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, तर ब्लू स्टार लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीर अडवाणी यांची सीआयआय पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
ही घोषणा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री [ सीआयआय ] च्या पश्चिम विभागीय परिषदच्या पहिल्या बैठकीत करण्यात आली.
नव्या नेतृत्वाखाली व्यवसाय वृद्धी, शाश्वत विकास आणि जागतिक विस्तारावर विशेष भर दिला जाणार आहे.
सीआयए पश्चिम विभागामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या प्रमुख राज्यांचा समावेश असून, उद्योगसंस्था, सरकार, शिक्षण क्षेत्र आणि समाज यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी नवीन नेतृत्व कार्यरत राहील.