सुखी जगायचे तर आनंद लांबणीवर टाकू नका : भरत रसाळे

Spread the news

सुखी जगायचे तर आनंद लांबणीवर टाकू नका : भरत रसाळे
कोल्हापूर : “आयुष्यामध्ये सुखी जीवन जगायचं असेल तर आनंद लांबणीवर टाकू नका “असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथ. शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केले . ते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महिला शाखेच्या वतीने घेतलेल्या विविध उपक्रमांच्या बक्षीस समारंभाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते . यावेळी मान्यवर म्हणूनअदिती केळकर ,नंदिनी पाटील ,रोहिणी हवालदार , शिवाजी भोसले , महादेव डावरे ,कुमार पाटील , आप्पासाहेब वागरे हे उपस्थित होते .
8 मार्च या “जागतिक महिला दिनानिमित्यत गेल्या पंधरावडया मध्ये महिलांसाठी सांस्कृतिक समुह नृत्ये , वकृत्व स्पर्धा , पदार्थ सजावट स्पर्धा , स्पॉट गेम्स अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या . त्यांचा बक्षीस समारंभ मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे पार पडला . या समारंभांच्या अध्यक्षपदावरून बोलतांना भरत रसाळे म्हणाले की ” नोकरी , संसार आणि जगण्याचा व्यवहार सांभाळता सांभळता महिलांना स्वतःसाठी जगण्यासाठी कमी वेळ मिळतो . इच्छा असूनही त्यांना आपल्या अंगातील सुप्त गुण दाखवता येत नाहीत व त्यांचा आनंद हिरावून घेतला जातो .म्हणून सुखी जगायचं असेल तर आनंद लांबणीवर टाकू नका . लगेचच तो मिळवा “असा सल्ला त्यांनी महिलांना दिला .यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली . सौ .नंदिनी कोंडेकर यांचा ” तू ज्योत बन ” या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाबद्दल सत्कार करण्यात आला . स्वागत शहराध्यक्षा चारुलता पाटील यांनी तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा सविता गिरी यांनी केले .आभार सारिका पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन शोभा शिंत्रे व नयना पाटील यांनी केले . या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन रोहिणी येडगे , छाया हिरुगडे , माणिक सपाटे , सुनिता डावरे शुभांगी गवळी यांनी केले .
या स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे
सांस्कृतिक समुह नृत्य :तेजस मुक्त विद्यालय कोल्हापूर (प्रथम) इंदूमती जाधव विद्यालयाचा संयुक्त गट (द्वितीय ) , शेलाजी वनाजी संघवी विद्यालय (तृतीय) वैयक्तिक स्पर्धा निकाल —
सजावट स्पर्धा ..
1. श्रीमती सोनाली अर्जुन पाटील- प्रथम क्रमांक (सरस्वती सावंत विद्यालय)
2. सौ .राधिका शिवराज मुसळे- द्वितीय क्रमांक (शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालय)
3. सौ .पद्मा संजय सुतार- तृतीय क्रमांक (प्रबुद्ध भारत विद्यालय)
वक्तृत्व स्पर्धा :
1. सौ लता अरुण टिपुगडे- प्रथम क्रमांक (इंदुमती जाधव विद्यालय)
2. सौ. संजना संजय जाधव- द्वितीय क्रमांक (साधना विद्यालय ,गडहिंग्लज)
3. सौ . राधिका शिवराज मुसळे -तृतीय क्रमांक (शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालय)
4.सौ.अश्विनी अनंतराव देसाई- उत्तेजनार्थ (साधना विद्यालय, गडहिंग्लज )
5.सौ. सीमा प्रदीप कुलकर्णी- उत्तेजनार्थ (शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालय)
सौ पद्मा संजय सुतार- उत्तेजनार्थ( प्रबुद्ध भारत विद्यालय)
… .. .. ..

  1. U­

 



Spread the news

You may also like

error: Content is protected !!