चांद्रयान चार मोहिमेचा आरंभ कधी ?
खासदार धैर्यशील माने यांनी वेधले संसदेचे लक्ष
कोल्हापूर,ता. १९ :
अंतराळ संशोधनात भारताचे नाव अव्वल स्थानावर आहे. आता याही पुढे जात भारत चंद्रयान-4 मोहिमेचा आरंभ कधी करणार आहे? या संदर्भात सरकारकडून काय तयारी सुरू केली आहे.असा मुद्दा उपस्थित करीत हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासह संसदेचे लक्ष वेधले.
दरम्यान, अंतराळवीर सुनिता विल्यम बुधवारी (दि. १९ ) रोजी तब्बल ९ महिन्यानंतर पृथ्वीवर दाखल झाल्या.भारतीय वंशाच्या असलेल्या सुनिता विल्यम यांच्या रूपाने भारताचा तिरंगा जगभर डोलाने फडकत आहे असे म्हणत खासदार माने यांनी त्यांचे अभिनंदन करत सभागृहात चंद्रयान-4 चा मुद्दा उपस्थित केला.
यावेळी महत्त्वपूर्ण चांद्रयान 4 या प्रश्नावर बोलताना खासदार माने म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करीत आहेत.शिवाजी महाराजांच्या प्रमाणे नरेंद्र मोदी एक व्हिजन घेवून देशाला प्रगतीवर नेत आहेत.यासाठी चंद्रयान मोहिम अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे चंद्रयान-4 या मोहिमेचा आरंभ करण्याचा सरकारचा विचार आहे का? याचे उद्देश आणि लक्ष काय आहे? एकुणच मोहिमेला किती खर्च येणार आहे ? याची सरकारने काय तरतुद के ली आहे ?याकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.तसेच इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण संदर्भात सभागृहात मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्रामधूम उपगृह सोडण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले; टेक्नॉलॉजी, टेलीव्हीजन क्षेत्रामध्ये भारताने अव्दितीय प्रगती केली आहे. चंद्रयान-4 मोहिमेचाही लवकरच आरंभ होईल. भारताचे स्वत:चे अंतरिक स्टेशन असेल २०४० ला भारतीय व्यक्ती अंतराळवर पाऊल ठेवेल.
भारतामध्ये १९६९ ला टेक्नॉलॉजी आल्याचे सांगत श्रीहरी कोटा हे आपले मोहिमेचे रोल मॉडेल आहेत.यात आणखीन सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. तामिळनाडूमध्येही अशा पध्दतीने उपगृह सोडण्याची सरकारकडून चाचपणी सुरू असल्याचे सांगितले.