रोटरी सेंट्रल कडून शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना मदत*

Spread the news

*रोटरी सेंट्रल कडून शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना मदत*
कोल्हापूर

  1. U­

 


रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रलच्या वतीने विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना मदत देण्यात आली. क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्राची गौरवगाथा या कार्यक्रमातून जमलेल्या आर्थिक निधीतून या सर्व संस्थांना उपस्थित देणगीदार प्रेक्षकांच्या हस्ते मदतीची पत्र देण्यात आली. तसेच
यामध्ये गांधीनगर येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी स्वच्छ पाण्यासाठी आर.ओ. युनिट, बालकल्याण संकुल ,उमेद मायेचं घर या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन जेवणाचे साहित्य , कुशीरे येथील आश्रमशाळेसाठी आर.ओ. युनिट, विद्या मंदिर बाळेघोल शाळेला शैक्षणिक साहित्य तसेच प्रकाश गायकवाड या सर्पमित्राला मदत असे उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या दिवशीच ही मदत केल्याने सर्व उपस्थितांनी रोटरी सेंट्रलच्या कामाचे कौतुक केले.
प्रास्ताविकात सेंट्रलचे प्रेसिडेंट संजय भगत यांनी क्लबच्या सर्व उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी इव्हेंट चेअरमन आर वाय पाटील , क्लब कम्युनिटी डायरेक्टर डॉ. महादेव नरके, सेक्रेटरी रवी खोत, ट्रेझरर निलेश पाटील तसेच संदीप साळोखे, अविनाश चिकनिस, विशाल पाटील यांच्यासह रोटरीयन उपस्थित होते.
इलेक्ट्रॉनिका फायनान्सचे सागर चौगले, युनियन बँक ऑफ इंडियाचे उपसरव्यवस्थापक संजय कुमार मंडल, शरण बसवा ,गुरप्रीत सिंग , आदिनाथ तांदळे कोल्हापूर अर्बन बँकेचे संचालक श्री.विश्वास काटकर , माय हुंडाईचे राजन गुणे, रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय अध्यक्ष एम.बी. शेख, माजी प्रांतपाल राजू भाई दोशी, श्रीनिवास मालू उपस्थित होते.

  •  


Spread the news

You may also like

error: Content is protected !!