*काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड*
*कोल्हापूर :* माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषद सदस्य आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी फेरनिवड करण्यात आली.अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनीही नियुक्ती केल्याची जाहीर केले.
आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीस चालना दिली आहे. ते, 2009- 14 च्या आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते त्याचबरोबर 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री, ग्रामविकास, परिवहन, माजी सैनिक कल्याण, गृहनिर्माण, संसदीय कार्य, माहिती आणि तंत्रज्ञान, अन्नऔषध अशा विविध खात्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर सतेज पाटील यांनी काँग्रेसला चालना दिली. भारत जोडो यात्रेचे अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रसारण करून श्री पाटील यांनी सर्व काँग्रेस जनांचे लक्ष वेधले होते.
*कोट:*
काँग्रेसने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता पक्षाने पुन्हा एकदा गटनेते पदाची जबाबदारी दिली आहे. या पदालाही न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केलाबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार.
*आमदार सतेज पाटील*