कोल्हापूर*
स्टेट बँक ऑफ इंडिया*च्या सामाजिक कृतज्ञता निधीतून *अलिमको* मार्फत आणि *जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा समाज कल्याण विभाग ,जिल्हा परिषद, कोल्हापूर* यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ४४८ दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले. या समारंभात पालकमंत्री श्री. प्रकाशराव आबिटकर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले व दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, *“दिव्यांगांच्या नशिबात शरीराने दिव्यांगता आली असली तरी त्यांच्यातील वेगवेगळ्या कला व गुण हेच त्यांचे वरदान आहेत. त्यांच्या उन्नतीसाठी जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राने मनापासून कार्यरत राहावे. यासाठी मी कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.”* समारंभाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेयन एस., अप्पर जिल्हाधिकारी . श्री. संजय शिंदे, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सुजाता इंदुलकर व मुख्य व्यवस्थापक मंदार पुनाळकर, . अतुल जोशी , दिव्यांग संघटनेचे देवदत्त माने आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत *जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक श्री. अमेय जोशी* यांनी केले, तर आभार *जिल्हा समाज कल्याण अधिकारी (जि. प.) श्री. संभाजी पोवार* यांनी मानले.