*भीमा कृषी पशू प्रदर्शनात चार दिवसात झाली २० कोटींची उलाढाल*
*गडहिंग्लज तालुक्यातील हासुरचंपू येथील स्वप्नील अशोक पवार यांचा मुऱ्हा जातीचा रेडा ठरला बेस्ट ऑफ द शो*
*सांगोला तालुक्यातील कडलास येथील विठ्ठल नामदेव पवार यांचा खिलार खोंड ठरला चॅम्पियन ऑफ द शो*
*हरियाणा पानिपत येथील पद्मश्री नरेंद्र सिंह, रणधीर सिंह यांचा विधायक रेडा ठरला प्रदर्शनाचे विशेष आकर्षण*
कोल्हापूर/प्रतिनिधी : *भीमा कृषी प्रदर्शन २०२५ मध्ये गडहिंग्लज तालुक्यातील हासुरचंपू येथील स्वप्नील अशोक पवार यांचा मुऱ्हा जातीचा रेडा ठरला बेस्ट ऑफ द शो. तर सांगोला तालुक्यातील कडलास येथील विठ्ठल नामदेव पवार यांचा खिलार खोंड ठरला चॅम्पियन ऑफ द शो. तर हरियाणा पानिपत येथील पद्मश्री नरेंद्र सिंह, रणधीर सिंह यांचा विधायक रेडा ठरला आहे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण.यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार हा सहयोगी संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र शेंडा पार्कचे डॉ.अशोक आनंदराव पिसाळ यांना देण्यात आला. आहे.बचत गट माध्यमातून बिर्याणी मधून मुनेरा मुजावर खाद्य पदार्थातून १ लाख १२ हजार रुपये उलाढला झाली आहे.तर बिर्याणी मधूनच ८० हजार रुपये उलाढाल ही सुरैया मुकादम यांनी आणि अमृता घोटणे मासे ६३.६०० उलाढाल केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी पशू व पक्षी प्रदर्शन २०२५ २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ ला मेरी वेदर मैदान येथे पार पडले. प्रदर्शनाला कर्नाटक गोवा सांगली सातारा बेळगाव कोकण या सह कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शहरातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. चार दिवसांमध्ये जवळजवळ ५ लाख शेतकऱ्यांसह लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.सतरा वर्ष आयोजित करण्यात येत असलेले हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरत आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे प्रदर्शन आम्हाला चांगल्या पद्धतीचे ठरत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.शेतीसाठी उपयुक्त साहित्याची खरेदी एकाच छताखाली आम्हाला करता आली एकापेक्षा एक असंख्य जनावरे आम्हाला पहावयास मिळाली यातून मी निश्चितच आम्हालाही आमची जनावरे यांचे संगोपन कसे करता येईल याबाबत अभ्यास करता आला अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून २० कोटींच्या आसपास उलाढाल चार दिवसांमध्ये झाली आहे. तर बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून एक कोटी रुपये का झालेले आहेत लढाल झालेली आहे. जगातील सर्वात उंच २५ कोटी किंमत असलेला सातव्या नॅशनल चॅम्पियन मिळविलेला विधायक मोरा जातीचा रेडा पाण्यासाठी नानांसह अबालभारती निरभद्र मैदानावर चार दिवस अलोट गर्दी केली होती.
*आज झालेले व्याख्यान*
पद्मश्री श्री. पोपटराव भागूजी पवार, माजी सरपंच, आदर्शगांव हिरवे बाजार, ता. जि. अहमदनगर यांनी ग्रामविकासामध्ये कृषीचे महत्व व ग्रामीण पातळीवर शेतकरी सहभाग.या विषयावर बोलताना जमीन संवर्धन, पाणी संवर्धन, शैक्षणिक सुविधा, निधर्मीपणा, व्यसनमुक्ती याविषयी त्यांनी केलेले बहुमोल असे प्रयत्न आणि निस्वार्थीपणे प्रत्येक कामामध्ये गावच्या ग्रामस्थांचा सहभागवड वृक्ष लागवड त्याचे संगोपन त्यामुळे गावातील विहिरी बोअर असे पाण्याचे स्त्रोत चांगल्या प्रकारे सुधारल्याने दारिद्र्य रेषेखाली कोणीही राहिलेले नाही. स्वतःच्या स्व कष्टावर गावचा विकास हा राज्य आणि देश पातळीवर तसेच जागतिक जागतिक पातळीवर मॉडेल म्हणून विकसित केला गेला त्या करिता पंतप्रधान मोदीजींनी महाराष्ट्राच्या सरपंचाला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले.आजही कोणाची मदत न घेता आदर्श हिवरे बाजारगाव जगाच्या पाठीवर प्रसिद्ध झाले आहे. कोल्हापूर हा प्रदूषित जिल्हा आहे या ठिकाणी खासदार म्हणून धनंजय महाडिक जे काम करत आहेत ते अप्रतिम आहे. यापुढेही त्यांनी माझे सहकार्य त्यांच्या कामांमध्ये घ्यावे मी त्यांना मदत करण्यास केव्हाही तयार आहे असे सांगून कृषी प्रदर्शनामध्ये मला मार्गदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
आधुनिक केळी लागवड तंत्रज्ञान या विषयावर श्री सुरेश मगदूम सिनिअर कृषी विद्यापीठ लिमिटेड जळगाव यांनी विचार मांडताना केळी लागवड कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. केळी लागवड करत असताना वेगळी शेती करणे आवश्यक असते. आष्टा, शिरोळ, सांगली या ठिकाणी ऊस आणि केळी असे दोन पिके शेतामध्ये शेतकरी घेतात. ऊस आणि केळी ही दोन्ही उत्पादने घेतली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते असे सांगितले. शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी जमिनीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. खतांचा वापरही कमी केला पाहिजे असे सांगितले.
*आज समारोप प्रसंगी दिले गेलेले पुरस्कार*
या प्रदर्शनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध पुरस्कार देण्यात आले.
*महिलांसाठी जिजामाता शेती भूषण पुरस्कार*
१)सौ.छाया तानाजी मोरे (मोरे ऍग्रो फार्म मुक्काम पोस्ट कोगे)
२ सौ. वैशाली ज्योतीराम माने (मुक्काम पोस्ट वाघापूर)
३)सौ. अश्विनी युवराज पाटील (मुक्काम पोस्ट चौंडाळ)
४)सौ.उषा रामदास व्हावळे (रा. सरूड)
४) सौ.मीनाक्षी अजित रामाने (रा.सातार्डे )
*भीमा शेतीभूषण पुरस्कार*
१ श्री विशाल कळगोंडा पार्वते(रा. सुळकुड)
२) श्री प्रभाकर शिवलिंग पाटील गावडे (रा. हंबीरे)
३) श्री अरविंद गणपती कल्याणकर (रा.घोळसेवाडी)
४) ॲड.श्री.विश्वजीत विलास सावंत (रा.कानूल)
५) श्री.माधवानांद रघुनाथ पाटील(रा.यमगे).
*युवा शेतकरी पुरस्कार*
१)श्री कुलदीप प्रकाश खोत (रा. चांदेकरवाडी)
२)श्री. हिम्मतराव नारायण जाधव (रा.पाडळी)
३) वारणा रिव्हर फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अंबप.
*भीमा आदर्श शेतकरी पुरस्कार*
१)श्री.जयवंत आनंदराव मगदूम (रा. केखले)
२)श्री.श्रीकृष्णात धोंडीराम पाटील (रा. वाकरे )
३)श्री.योगेश धोंडीराम पाटील (रा. बोर पाडळे )
४)श्री. मारुती हरी पवार (रा. सावतेवाडी).
५)श्री. रवींद्र मारुती जगताप (रा. नांदगांव )
६)श्री. बाजीराव दत्तू पाटील (रा. तिरपन)
७) श्री. दिग्विजय गणपतराव पाटील (रा. अंबप)
८)श्री. विकास रमेश घरपणकर (रा.खानापूर )
९)श्री. सचिन शशिकांत गायकवाड (रा. बहिरेवाडी )
१०)श्री. भैरवनाथ शामराव पाटील (रा. वरणगे )
११)श्री. विलास कृष्णा संकपाळ (रा. नेरली).
*भीमा कृषी उत्कृष्ट संशोधक तंत्रज्ञ पुरस्कार*
१)डॉ. सुहास दामोदर भिंगारदेवे(रा. कसबा बावडा)
२) डॉ. संभाजी शिवाजी जाधव (रा. सहाय्यक प्राध्यापक पशुसंवर्धन विभाग कृषी संशोधन केंद्र शेंडापार्क कोल्हापूर.
३)डॉ. सुप्रिया प्रकाश कुसळे संस्थापक संचालक श्री सूर्या रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.
*भीमा आदर्श कृषी विस्तार पुरस्कार*
१) श्री जयपाल भिमराव बेरड कृषी सहाय्यक राजापूर तालुका शिरोळ.
२) श्री विजय संभाजी कांबळे कृषी सहाय्यक वेसरडे तालुका भुदरगड.
३) श्री.प्रदीप वसंतराव रोकडे कृषी सहायक उचगाव.
४) श्रीमती. रूपाली तुकाराम कोळी कृषी सहाय्यक जयसिंगपूर.
.५) श्री.राहुल सीताराम पाटील कृषी सहायक तारळे खुर्द.
*भीमा आदर्श गुणवंत पशुवैद्यक*
डॉ.संदीप आनंदराव फरकाडे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक म्हणून डॉ. गुलाब सोमाजी लाडे, डॉ. जयंत आत्माराम खानेकरे, डॉ. जगदीश माधव बोंडे, डॉ.दत्ता अण्णाजी ननावरे, डॉ. पवन विष्णू भागवत आदींना गौरविण्यात आले.
याचबरोबर अदात खिलार खोंड गट, दोन दाती खिलार खोंड गट, चार दाती खिलार खोंड गट,सहा दाती खिलार खोंड गट, खिलार पूर्ण दाती
खोंड गट, खिलार गाय गट,अदात खिलार कालवड गट, दोन दाती खिलार कालवड गट, चार दाती खिलार कालवड गट, देवणी गाय गट, देवणी खोंड गट, लाल कंधारी खोंड गट, लाल कंधारी कालवड गट, दोन दाती देवणी खोंड गट, चार दाती देवणी खोंड,कंकरेज गाय गट,
कंकरेज खोंड गट,कंकरेज कालवड गट, एचएफ संकरित गाय गट, जर्सी संकरित गाय गट, पुंगनूर गाय गट, एचएफ संकरित कालवड गट, मुऱ्हा रेडा गट, पंढरपुरी म्हैस गट, पंढरपुरी रेडा गट, अश्वगट काठेवाडी, सानेन मादी शेळी गट, अमेरिकन बेंटम शेळी गट, अमेरिकन बेंटम बोकड गट, उस्मानाबादी बोकड गट चायना सिंग बोकड गट आफ्रिकन बोअर बोकड गट, सानेन बोकड गट, डॉरपर मेंढी गट,डॉरपर मेंढी गट, मीट मास्टर मेंढा गट, विविध प्रकारचे पक्षी, लहान छोटे विविध प्राणी आदी गटातील पशू पक्षी,जनावरे यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
*चार दिवसात ठरलेले खास आकर्षण*
*जगातील सर्वात उंच पानिपत हरियाणातील पद्मश्री नरेंद्रसिंग यांचा ४ वर्षाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा विधायक नावाचा रेडा आणि चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण, *आप्पाचीवाडी येथील विजय जाधव आणि सागर चौगुले यांचा पाच वर्षाचा शंभू सहा फूट उंच आणि सात फूट लांब आहे बैल (वळू)*,पाच वर्षाची देवणी गाय, साडेपाच वर्षांचे राम आणि रावण नावाचे दोन कंधारी वळू,*आफ्रिकन बोअर शेळी,मीट मास्टर व ड्रॉपर (मेंढी)सानेन शेळी खास आकर्षण ठरत आहेत.*
*अर्जंनि येथील सात किलो वजनाची मैलोडी जातीचे कलिंगड,*शिवाय रेशीम कोष, शंकरवाडी कागल येथील चार किलोचा मुळा, हेरले येथील पावणे सात किलोचा केळीचा घड, कडेगाव येथील १३००७ ऊसाची नवीन वाण आकर्षण ठरले. पाच किलोचा चकाट कोबी, अडीच फूट लांब असलेला दिग्विजय नावाचा हरभरा, ऑर्किडची फुले, गडहिंग्लज येथील रेवती जातीची ज्वारी, भडगाव गडहिंग्लज सुभाष पाटील यांचा ऑर्किड पांढरी गुलाबी फुलेसाडेपाच वर्षांचे राम आणि रावण नावाचे दोन कंधारी वळू आफ्रिकन बोअर शेळी,मीट मास्टर व ड्रॉपर (मेंढी)सानेन शेळी खास आकर्षण ३६५ दिवसात ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्टेलियन कोंबडी,जगातील सर्वात छोटा जापनीज बेंटम कोंबडा, बारा किलो वजनाचा दीड वर्षाचा टर्की कोंबडा*अमेरिकन बिल्टम जातीचे बोकड तीन वर्ष आठ महिने आणि चार वर्षाची १८ इंचाचे बोकड, कोलंबियन ब्रम्हा एक वर्षाचा कोंबडा*
या प्रदर्शनामध्ये ४५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग नोंदविला होता.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आले होते.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून देण्यात आली.चार दिवस प्रदर्शन स्थळी शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने भीमा कृषी प्रदर्शनात मांडण्यात आलेले प्रोजेक्ट
ज्यात ऊस उत्पादन वाढीसाठी सुपर केनर्सरी द्वारे ऊस रोप तयार करणे,
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गतसामूहिक शेततळे प्लास्टिक आच्छादन हरितगृह कांदाचाळ रायपनिंग चेंबर शीतगृह पॅक हाऊस शेडनेट हाऊस फलोत्पादन यांत्रिकीकरण,
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड बांधावर फळबाग लागवड गांडूळ युनिट नाडेफ कंपोस्ट युनिट,पौष्टिक तृणधान्य ज्वारी नाचणी राजीगरा बाजरी वरई याच्या आहारातील महत्त्व,वैयक्तिक शेततळे क्षारपड जमीन सुधारणा माती नमुना काढणे,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान,महाडीबीटी अर्ज एक योजना अनेक,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन.ड्रोन माध्यमातून शेती कशी करावी याची माहिती चार दिवसात पहाण्यास मिळाली.
आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली गेली शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण ठरले ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी ,काळा जिरगा,दप्तरी, आदि नमुनांचे तांदूळ होते चार दिवसात तांदळाची तसेच नाचणी सेंद्रिय गूळ,हळद यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी – बियाणे पाहाव्यास मिळाले आणि त्यांची खरेदी करता आली.
याचबरोबर प्रदर्शनामध्ये पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीचे घोडे, विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळाले. शिवाय राधानगरी येथील घरगुती हळद,व अन्य शेतकरी यांची हळद,मसाले,सेंद्रिय गूळ नाचणी,उडीद, विविध फळे पेरू,मध, जाम,काजू,बदाम,विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते त्यांची खरेदी झाली.शेवटच्या दिवशी प्रदर्शन स्थळी अलोट गर्दी लोकांनी शेतकऱ्यांनी केली होती.सायंकाळी आपल संगीतायन हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.
प्रदर्शनास हाऊस ऑफ इव्हेंट, असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले व आपला सहभाग नोंदवला. कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले.सुजित चव्हाण
हाऊस ऑफ इव्हेंट यांनी कृषी प्रदर्शन २०२५ चे उत्कृष्ट प्रकारचे नियोजन केले होते.या प्रदर्शनासाठी प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडे, दादा, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी, डॉ.एन.डी पाटील, डॉ.सचिन पाटील,श्री.विलास इंगवले,किरण रणदिवे,प्रमोद खोपडे,दिलीप दळवी, डॉ.आनंदा पोवार,सचिन पाटील कृषी विभागाची टीम आदींनी अथक परिश्रम घेतले या सर्वांचा सन्मान सांगता समारंभात करण्यात आला.
*सेंद्रिय गुळासह तांदूळ प्रचंड मागणी*
प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात गुळाची विक्री झाली सेंद्रिय गूळ खरेदी करण्यावर लोकांनी अधिक भर दिला आहे.तर मोठ्या प्रमाणात उच्चांकी तांदळाची विक्री झाली.
भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात चार दिवसात विक्री झालेला शेतमाल :
1) सेंद्रीय गूळ : ३५०० kg
2) इंद्रायणी तांदूळ : ५४०० kg
3) आजरा घनसाळ : ४२०० kg
4)रत्नागिरी २४ तांदूळ : ४००० kg
5)सेंद्रीय हळद : १४५० kg
6)नाचणी : १२००kg
7)विविध बी बियाणे २०००किलो.
8)काजू ८०० kg
9)बेदाणे ७०० kg