कोल्हापूर
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात एकीकडे राज्य सरकार भूसंपादनासाठी आग्रही झाले असताना दुसरीकडे बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीमध्ये जे मुख्यमंत्री फडणवीस व महायुती सरकार वारंवार शेतकऱ्यांची चर्चा करतो म्हणून सांगतात पण चर्चा करत नाहीत त्यांना जाब विचारण्यासाठी व शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी विधानसभा अधिवेशनावर 12 मार्च रोजी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
यावेळी बोलताना *आमदार सतेज पाटील म्हणाले*,” निवडणुकीपूर्वी जे महायुतीच्या नेत्यांची महामार्ग रद्द करण्याची भाषा होती ती निवडणुकीनंतर पुन्हा बदलली आहे. निव्वळ कोल्हापूर जिल्हा तांत्रिक दृष्ट्या महामार्गातून वगळणे शक्य नाही. उच्च न्यायालय वगैरे अशा गोष्टी वगळून जनतेच्या न्यायालयामध्ये आता हे आंदोलन तीव्रत करूया. बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या एकजुटीने विधानसभेवर मोर्चा यशस्वी करूया.
यावेळी बोलताना *गिरीश फोंडे म्हणाले*,” विधानसभेमध्ये जरी महायुती सरकारचे बहुमत असले तरी रस्त्यावरती मात्र आम्हा शेतकरी व नागरिकांचे बहुमत आहे. कंत्राटदार धार्जिना शेतकरी व पर्यावरण विरोधी असा हा महामार्ग म्हणून पाडण्यासाठी आम्ही पुन्हा 12 जिल्हे समजून काढून दिल्ली मुंबई तुमचे सरकार जरी असले तरी आमच्या गावात आमचे सरकार या सूत्राने आंदोलन करून मंत्र्यांना व मोजणी अधिकाऱ्यांना गावबंदी, जिल्हा बंदी करू”
*शिवसेनेचे विजय देवणे म्हणाले*,” शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आलेलं हे सरकार निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या पाया पडत होते. आता मात्र निवडणूक झाल्यानंतर शक्तीपीठ महामार्ग रेटत शेतकऱ्यांच्या पाठीत सुरा खुपसत आहेत. कोल्हापूर स्टाईलने आता आंदोलन करावे लागेल”.
*लातूरचे गजेंद्र येळकर म्हणाले,*” मराठवाड्यामध्ये आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. मराठवाड्याला प्यायला पाणी नाही. मात्र महायुती सरकार हे पर्यायी महामार्ग असताना देखील अनावश्यक असा शक्तिपीठ महामार्ग आमच्यावर लादत आम्हाला आत्महत्या करायला प्रवृत्त करत आहे.”*सोलापूरचे विजय पाटील म्हणाले*,” सरकार कितीही मुंबईत बसून आदेश काढू दे पण आमच्या गावामध्ये आमची बागायती शेती मध्ये आम्ही अधिकाऱ्यांना व मंत्र्यांना पाय ठेवू देणार नाही”.
यावेळी 12 मार्च रोजी विधानसभा मोर्चा काढणे, आमचे गाव आमचे सरकार असे आंदोलनाचे सूत्र राबवणे, दुसरी विभागीय परिषद लातूर व तिसरी ही वसमत हिंगोली येथे अनुक्रमे मार्च व एप्रिल महिन्यामध्ये घेणे, बारा जिल्ह्यातून भविष्यात संघर्ष यात्रा काढणे असे ठराव एकमताने करण्यात आले.
सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले तर आभार शिवाजी कांबळे यांनी मानले.
या बैठकीमध्ये आमदार जयंत आसगावकर, महादेव धनवडे, विक्रांत पाटील, शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील (गोकुळ संचालक), प्रकाश पाटील, शिवाजी पाटील, आनंदा पाटील, युवराज कोईगडे,विक्रम पाटील, संग्राम पाटील, युवराज पाटील, सुरेश संकपाळ