कोल्हापूर
भारतीय क्रीडा प्रेमींच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचे कुटुंब आज कोल्हापुरात आले आहे. पत्नी अंजली, मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा हे तिघेही सकाळी कोल्हापूर विमानतळावर आले. तेथे उद्योजक तेज घाटगे यांनी त्यांचे स्वागत केले.
काही दिवसापूर्वी सचिन तेंडुलकर ही कोल्हापुरात आले होते त्यांनीही नरसिंहवाडी येथे दत्त दर्शन घेतले. त्याला पाहण्यासाठी वाडीत मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर आता सचिनचे संपूर्ण कुटुंब कोल्हापुरात आले. आहे.
सकाळी मुंबईहून विमानाने अंजली अर्जुन आणि सारा यांचे विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर हे तिघेही दत्त दर्शनासाठी नरसिंहवाडीला प्रयाण केले.
सायंकाळी ते पुन्हा कोल्हापुरात येणार असून अंबाबाईचे दर्शन घेण्याची शक्यता आहे.