कोल्हापूर :
एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशन (एएफसी) विकास समितीवर केएसए चे अध्यक्ष आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची निवड झाली आहे. आशियाई खंडातील महासंघटनेवर काम करण्याचा असा मान प्रथमच कोल्हापूरला मिळाला आहे.
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन (नवी दिल्ली) व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (मुंबई) या संघटनांमध्ये मालोजीराजे छत्रपती
सदस्य व उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी फुटबॉलच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत एशियन फुटबॉल फेडरेशनने त्यांची मलेशिया येथे झालेल्या बैठकीत विकास समितीवर सदस्यपदी नियुक्ती केली. यासाठी एआयएफएफने त्यांच्या केली होती. नावाची शिफारस या निवडीसाठी मालोजीराजे यांना खासदार शाहू छत्रपती महाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे, विफाचे अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.