कोल्हापूर
बांधकाम व्यावयसियकांची संघटना असलेल्या क्रिडाई कोल्हापूरच्या अध्यक्षपदी पुन्हा के.पी. खोत तर उपाध्यक्षपदी प्रकाश देवलापूरकर व चेतन वसा यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष महेश यादव व सुजय होसमनी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
नवीन पदाधिकारी असे… अध्यक्ष- के.पी. खोत, उपाध्यक्ष- प्रकाश देवलापूरकर व चेतन वसा, सचिव- गणेश सावंत, खजिनदार -अजय चंद्रशेखर डोईजड, सहसचिव- श्रीराम पाटील, निखील शहा, नंदकिशोर पाटील व सागर नालंग. कार्यकारिणी सदस्य – सचिन ओसवाल,, गौतम परमार, प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, चेतन चव्हाण, संदीप पोवार, अमोल देशपांडे, अतुल पोवार, संगाम दळवी, सुनिल चिले, श्रीकांत पाटील, मौक्तिक पाटील