*कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री प्रकाश आबिटकर*
*महापालिकेची यंत्रणासक्षम करून शहराचा विकास साध्य करू : आमदार राजेश क्षीरसागर*
*पालकमंत्री पदी नियुक्तीबद्दल शिवसेनेकडून जाहीर सत्कार*
कोल्हापूर दि.१५ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांची शिवसेना शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उप मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे महायुतीचा विजय सुकर झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी सर्वांच्या साथीने पूर्णत्वास घेवून जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांनी केले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने त्यांच्या पालकमंत्री पदी नियुक्तीबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले कि, मी शिवसेनेत इतरांपेक्षा नवीन आहे. परंतु नशिबाची साथ मला मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. ही जबाबदारी पार पाडताना सर्वांनाच विश्वासात आणि सोबत घेवून काम करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे नवे व्हिजन आपण डोळ्यासमोर ठेवून काम करुया. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटना वाढीसाठी एकजुटीने काम करुन शिवसेनेचा बालेकिल्ला अधिक मजबूत करुया, असे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचा पालकमंत्री व्हावा, अशी सर्वांची मागणी होती ती मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आहे. पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल मंत्री प्रकाश आबिटकर यांचे अभिनंदन.. या माध्यमातून नूतन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर शहराला भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी केली. यासह आगामी काळात हद्दवाढ, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पूरनियंत्रण प्रकल्प, आय.टी.पार्क, रिंग रोड, ओव्हर ब्रिज, पार्किंग सुविधा यामाध्यामातून शहराचा विकास साध्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, युवासेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, शहरप्रमुख रणजीत जाधव, महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, दीपक चव्हाण, कमलाकर जगदाळे, राज जाधव, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष निलेश हंकारे, महिला आघाडीच्या मंगलताई साळोखे, पूजा भोर, अमरजा पाटील, मंगलताई कुलकर्णी, पूजा कामते, पूजा पाटील, नम्रता भोसले, तेजस्विनी घाटगे, सुनीता भोपळे, पूजा आरदांडे, राधिका पारखे, प्रीती अतिग्रे, तन्वीर बेपारी, अंकुश निपाणीकर, रिक्षासेनेचे शहरप्रमुख अल्लाउद्दिन नाकाडे, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, गजानन भुर्के, कपिल केसरकर, श्रीकांत मंडलिक, शैलेन्द्र गवळी, युवासेनेचे मंदार पाटील, आदर्श जाधव, विपुल भंडारे, सौरभ कुलकर्णी, मेघराज लुगारे, सचिन क्षीरसागर, बाळासाहेब शेलार, किरण पाटील, नझीर पठाण आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.