कोरे अभियांत्रिकीचे प्रा. अभिजित शंकर माळी यांना पीएच.डी. पदवी 

Spread the news

वारणानगर: येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक अभिजित शंकर माळी यांना डॉ . डी . वाय पाटील युनिव्हर्सिटी नेरुळ नवी मुंबई कडून पी.एच.डी. पदवी प्रदान झाली आहे.

प्रा. अभिजित शंकर माळी हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात अनुभवी प्राध्यापक असून, त्यांनी “केऑटिक सिक्रेट कि फॉर एल . एस. बी. कोडींग इन स्टॅगनोग्राफी ओव्हर ओ एफ डी एम वायरलेस चॅनेल यूझिंग कव्हर बेस्ड इमेज” या विषयावर संशोधनपर प्रबंध सादर केला. या संशोधनासाठी त्यांना प्राध्यापक डॉ. मनोज डोंगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी त्यांचे अभिनंदन केले. आपल्या संशोधनाचा उपयोग समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी करावा असा सल्ला डॉ. विनयरावजी कोरे यांनी दिला. अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. बी. टी.साळोखे व विभागप्रमुख डॉ. एस. टी.जाधव . यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळी:

प्रा. अभिजित शंकर माळी यांना पी.एच.डी. पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करताना,डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. बी. टी.साळोखे, विभागप्रमुख डॉ. एस. टी.जाधव . व इतर

 

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!