कोल्हापूर दि.०९ : मुख्यमंत्री असताना ‘कॉमन मॅन’ प्रमाणे कोणताही गर्व न ठेवता सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सद्या उपमुख्यमंत्री पदावर काम करताना “डेडिकेट कॉमन मॅन” हि संकल्पना समोर ठेवून सर्वसामन्य नागरिकांना न्याय देण्याचे काम एकनाथ शिंदे साहेब करत आहेत. देशाच्या, राज्याच्या इतिहासात अनेक राजकीय व्यक्ती घडल्या परंतु, सर्वसामान्यांचा विचार करून पदाचा अधिकार सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरणारा नेता म्हणजेच एकनाथ शिंदे असून, राजकारणाच्या पटलावर सर्वसामान्यांचा ठसा उमटविणारे नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करावा लागेल, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य शिवसेना, युवासेनेतर्फे आज राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ साजरा करण्यात आला. शिवसेना युवासेनेतर्फे आज भोईराज भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील ६१ ‘कॉमन मॅनचा’, सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, प्रत्येक समाजघटकासाठी अहोरात्र तत्पर राहण्याचे कार्य उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब सातत्याने करत आहेत. “सर्वसामान्यांचे हित सर्वतोपरी” साहेबांचे हे ब्रीदवाक्य जोपासण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता बांधील आहे. समाजासाठी केलेल्या व करत असलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेवून शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील ६१ असामान्य कर्तृत्वांचा “कॉमन मॅन” म्हणून सत्कार करत आहोत.
यातून समाजकार्यासाठी इतरांना प्रेरणा मिळेलच यासह या सर्वसामान्य पण असामान्य कर्तृत्वांच्या कार्याचा सत्कारही झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यपद्धती “कॉमन मॅन” प्रमाणेच असून, असामान्य काम करताना त्यांना कोणताही गर्व नाही. ५०७ कर्मचाऱ्याना सेवेत कायम करण्याचा धडाडीचा निर्णय त्यांनी एका दिवसात घेतला.
रस्ते, रंकाळा तलाव, केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी, कन्व्हेन्शन सेंटर निर्मितीच्या घोषणा न करता निधी देवून कामास सुरवात केली यातून त्यांची कार्यतत्परता दिसून येते. अशा सर्वसामान्यांच्या नेत्याला दीर्घायुष्य देवो, असे आई अंबाबाई चरणी त्यांनी साकडे घातले.
यावेळी बोलताना माजी खासदार संजय मंडलिक यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम घेतल्याबद्दल युवासेनेच्या पदाधिकाऱ्याचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ तास जनतेसाठी वेळ देतात. त्यांचीच कार्यपद्धती शिवसेनेचा प्रत्यके पदाधिकारी आणि शिवसैनिक अंगीकारत आहे. शिंदे साहेबांनी सर्वसामान्य लोकांसाठी भरीव काम केले आहे.
शहरासाठी निधी दिला आहे. समाजकार्याचा वसा शिवसैनिक पुढे नेत असून विविध क्षेत्रातील सर्वसामन्य असलेल्या पण असामान्य कर्तुत्व केलेल्या नागरिकांचा सत्कार हे या नागरिकांच्या कामाचे कौतुक असून त्यांना पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आदिल फरास, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. तर सत्कारमूर्तींच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार विजेते सागर बगाडे, फुटबॉल प्रशिक्षक डॉ.अभिजित वणीरे, जेष्ठ हिंदुत्ववादी बाबा वाघापूरकर, सी.ए. सुनील नागावकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी वृक्षप्रेमी अमोल बुद्ढे, अवनी संस्थेच्या अनुराधा भोसले, कला शिक्षक विजय टिपुगडे, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प.नाना महाराज पाटील, हिंदुत्ववादी कार्यकर्ते गजानन तोडकर, सर्पमित्र ऐश्वर्या मुनीश्वर, वृक्षप्रेमी प्रतिक बावडेकर, रक्तदाता व प्राणीमित्र धनंजय नामजोशी, रुग्णसेवक कृष्णा लोंढे, पर्यावरणप्रेमी गिर्यारोहक प्रमोद पाटील, जीवरक्षक उदय निंबाळकर आदी ६१ “कॉमन मॅन” सत्कार करण्यात आले.
यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, शहरप्रमुख रणजीत जाधव, युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद चव्हाण, उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण, महिला आघाडीच्या मंगलताई साळोखे, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, पूजा भोर, नम्रता भोसले, तेजस्विनी घाटगे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष निलेश हंकारे, प्रशांत साळोखे, राहुल चव्हाण, दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे, उदय भोसले, अरविंद मेढे, अंकुश निपाणीकर, सौरभ कुलकर्णी आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.