कोल्हापूर दि.०८ : शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य शिवसेना, युवासेनेतर्फे रविवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ साजरा करण्यात येणार आहे.
प्रत्येक समाजघटकासाठी अहोरात्र तत्पर राहण्याचे कार्य उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब सातत्याने करत आहेत. “सर्वसामान्यांचे हित सर्वतोपरी” साहेबांचे हे ब्रीदवाक्य जोपासण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता बांधील आहे. याच जाणिवेतून शिवसेना युवासेनेतर्फे जिल्ह्यातील ६१ ‘कॉमन मॅनचा’, सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले कि, समाजासाठी केलेल्या व करत असलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेवून शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील ६१ असामान्य कर्तृत्वांचा “कॉमन मॅन” म्हणून सत्कार करत आहोत. यातून समाजकार्यासाठी इतरांना प्रेरणा मिळेलच यासह या सर्वसामान्य पण असामान्य कर्तृत्वांच्या कार्याचा सत्कारही होणार आहे.
उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित उद्या दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता “भोईराज भवन, तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर” येथे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहितीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.