श्रीमंत संस्थेचे पदाधिकारी आले दणदणीत मताने निवडून
रेसिडेन्सी क्लबवर प्रोग्रेसिव्हचे वर्चस्व
सर्व जागा आल्या निवडून
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीमंतांचे वर्चस्व असलेल्या आणि तेच सभासद असलेल्या रेसिडेन्सी क्लबच्या त्रैवार्षिक निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह ग्रुप पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. रविवारी रात्री निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी निकाल जाहीर करताच विजयी उमेदवार आणि समर्थकांनी जोरदार जल्लोष केला.
या निवडणुकीत नित्यानंद प्रभू हे एकमेव अपक्ष जादा उमेदवार होते. त्यांच्या माघारीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. पण वेळेत माघार घेण्यात अपयश आल्यामुळे ही निवडणूक लागली.
या निवडणुकीत उद्योजक सतीश घाटगे, अमर गांधी, विक्रांत कदम, अभिजित मगदूम यांच्या नेतृत्वाखाली प्रोग्रेसिव्हचे पॅनेल तयार करण्यात आले. रविवारी दिवसभर मतदान झाले. सायंकाळी मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये प्रोग्रेसिव्ह चे सर्व 15 उमेदवार निवडून आले.
या निवडणुकीत सचिन घाटगे यांना सर्वाधिक मते मिळाली. त्यांना सर्वाधिक ११३९ अभिजीत मगदूम यांना अकराशे तीस तर शीतल भोसले यांना 1122 मते मिळाली. विरोधी गटाच्या वतीने उमेदवार असलेल्या नित्यानंद प्रभू यांना फक्त ४४५ मते मिळाली.
विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते अशी…
सचिन घाटगे ११३९, अभिजित मगदूम ११३०, शीतल भोसले ११२२, तुषार घाटगे ११२२, सचिन झंवर ११०३, विक्रांत कदम ११०२, नील पंडित बावडेकर ११०२, समीर कुलकर्णी १०९९, रवी संघवी१०८७, नरेश चंदवाणी १०७६, डॉ. पृथ्वीराज जाधव १०७१, नयन सामाणी १०५६, सचित गांधी १०४८, शंकर दुल्हानी १०४५, साईदास खणगावे १००५