*आठव्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण*
चिल्लर पार्टी कौतुकास पात्र : साधना पाटील
कोल्हापूर : चिल्लर पार्टीसारख्या संस्थेने महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी बालचित्रपटांची पर्वणी मिळवून दिली आहे. गेली सात वर्षे ही संस्था हा महोत्सव सातत्याने राबवित असल्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत, अशा शब्दात कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांनी चिल्लर पार्टीचे कौतुक केले.
महापालिकेत चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे होणाऱ्या आठव्या बालचित्रपट महोत्सवाच्या भिरभिरणाऱ्या फुलपाखराचे छायाचित्र असलेल्या लोगोचे अनावरण शुक्रवारी पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात दि. १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी रंगणाऱ्या या महोत्सवात सहा चित्रपट मोफत दाखविले जाणार आहेत. यावेळी शैक्षणिक पर्यवेक्षिका चंद्रकांत कुंभार, विजय माळी, शैलेश चव्हाण, अभय बकरे, सुधाकर सावंत, बाळासाहेब कांबळे, शिवप्रभा लाड, ओंकार कांबळे उपस्थित होते.
फोटोओळी : कोल्हापूरात महानगरपालिका कार्यालयात शुक्रवारी चिल्लर पार्टी बाल चित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण साधना पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी चंद्रकांत कुंभार, विजय माळी, शैलेश चव्हाण, अभय बकरे, सुधाकर सावंत, बाळासाहेब कांबळे, शिवप्रभा लाड, ओंकार कांबळे उपस्थित होते.