अनिल पाटील यांचा वाढदिवस उत्साहात
कोल्हापूर : वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी संचालक अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सहकार, बैंकिंग, – शिक्षण, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. कसबा सांगाव व हिंगणगाव येथे १०० जणांनी रक्तदान केले. आरोग्य शिबिरही घेण्यात आले.
वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात उद्योगपती व पार्श्वनाथ सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष शंकर पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसूर्लेकर, माजी महापौर सुनील कदम प्रमुख उपस्थित होते.
वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांचा वाढदिवसानिमित्त उद्योगपती शंकर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दिविषा वर्धमाने, दिग्विजय वर्धमाने, शीला पाटील, श्वेता पाटील उपस्थित होते.
सभासद, ग्राहक यांच्या आर्थिक उन्नतीसाठी वापरले. कोणताही स्वार्थ न बाळगता पारदर्शीपणे शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार यांच्या हितासाठी कार्यरत राहिलो. भविष्यातही सहकाराचा विचार अधिक प्रभावीपणे जोपासला जाईल, असे मत अनिल
पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार सत्यजित
पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, संतोष धुमाळ, उद्योगपती सुभाष चौगुले, रवींद्र जाधव, संजय देसाई, श्रद्धा वर्धमाने, दिग्विजय वर्धमाने, विशालं शेटे, अजित शेटे, राजन पाटील, श्रीकांत नागवेकर, अमर गाताडे, कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन, पार्श्वनाथ बँक व वसंतराव चौगुले पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. शशिकांत मोरे यांनी स्वागत केले.