सहकाराचा आदर्श मानदंड

Spread the news

  1. सहकाराचा आदर्श मानदंड असलेल्या कोल्हापूर येथील वसंतराव चौगुले चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ,कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष ,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक ,सामाजिक कार्यातील आघाडीचे नेतृत्व आदरणीय अनिल पाटील यांचा आज वाढदिवस आहे.यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा….
    कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील शेतकरी कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या अनिल पाटील यांनी जीवनात श्रमाला, संस्कारशील विचाराला,सामान्य माणसांच्या मदतीला हात देत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी घेतलेली भूमिका फार महत्वाची आहे.आपण ज्या मातीत जन्मलो ती माती आणि ज्या नात्यात वाढलो ती नाती कधी विसरायची नसतात हा संदेश त्यांनी कधी दुर्लक्षित केला नाही.तो कृतिशील पणे जोमाने जोपासला. आपल्या कार्याला कधी विश्रांती दिली नाही.त्यामुळे न थकता सकारात्मकतेने त्यांनी सहकारातून समृध्दी आणली. शिक्षणातून प्रगती साधत नवे बदल स्वीकारत जगाच्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकाविणारे विद्यार्थी घडविण्यासाठी शैक्षणिक चळवळ गतिमान केली.उपेक्षितांच्या गरजवंताच्या पाठीशी हा माणूस हिमाल्यासारखा सतत उभा राहिला आहे.त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाची,कर्तृत्वाची पडलेली छाप प्रत्येकाला अंचबित करतेच पण आनंद, समाधान ही देते.
    बुध्दीचातुर्य कौशल्य आणि ज्ञानाच्या कसोटीवर अनिल पाटील यांनी उच्च शिक्षितांनाही लाजवेल असे कार्य केले आहे.वयाच्या अठराव्या वर्षी कोल्हापुरातील अनिल चौगुले यांच्या अडत दुकानात दिवाणजी झालेला हा माणूस जिल्ह्याच्या अर्थकरणाच्या निर्णय प्रक्रियेतील मुख्य घटक बनला असताना सुध्दा अजूनही दिवाणजीची नोकरी करीत आहे.या कुटुंबातील वसंतराव चौगुले या शिस्तप्रिय व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला.त्यांच्या नावाने त्यांनी वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना ३७ वर्षापूर्वी केली.
    या संस्थेचा विस्तार राज्यात झाला असून २३ शाखामधून त्यांनी सामान्य माणसांच्या पर्यंत अर्थकारणाची गंगा पोहोचविली आहे.साडेतीनशे कोटींच्या ठेवीकडे वाटचाल करणाऱ्या या संस्थेने ग्राहक,सभासद यांच्याशी आपुलिकीचे,विश्वासाचे स्नेहाचे नाते निर्माण केले आहे.त्यामुळे बँकिंग क्षेत्रात कितीही अडचणी वादळे आली तरी ही संस्था भक्कमपणे पाय रोवून उभी राहिली आहे.ती नुसती उभी नाही तर यशस्वी अर्थकारणाची मार्गदर्शक सल्लागार बनली आहे.अनिल पाटील यांच्या नेतृत्वामुळे ही संस्था सतत प्रगतीचे टप्पे पार करीत सहकाराच्या विश्वातील सर्वोच्च टोकावर उत्कृष्टतेचा झेंडा डौलाने फडकवत राहिली आहे.
    सामाजिकभान त्यांना नेहमी संवेदनशील बनविते.त्यामुळे सामाजिक दायित्व हा त्यांच्यातील गुण त्यांना दुसऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावित राहिला आहे.सामाजिक उपक्रमात क्रियाशील राहतात.संकटकाळात तर चोवीस तास अलर्ट असतात त्यामुळे मदतीला तात्काळ धावून जातात. संस्थेतील कर्मचाऱ्यांच्यावर त्यांचे अतोनात प्रेम आहे.त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत.त्यामुळे अनिल पाटील हे कर्मचाऱ्यांचे अढळ श्रध्दास्थान बनलेले आहेत.कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमांतून जिल्ह्यातील पतसंस्थांना बळकटी देण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले आहेत.
    शिक्षणच परिवर्तन घडवू शकते.समाजाला पुढे नेवू शकते.यासाठी गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देणाऱ्या वसंतराव चौगुले इंग्लिश स्कूल त्यांनी मोरेवाडी येथे सुरू केले.सांगाव मध्ये ही स्कूल उत्तमपने सुरू आहे.प्रगतीचा नवा ध्यास घेणारे उत्तुंग करियरची झेप घेत स्वप्न पूर्ती करणारच असा विश्वास देणारे शैक्षणिक वातावरण या शैक्षणिक संकुल परिसरात आहे.त्यामुळे पालक विद्यार्थी प्रवेशासाठी या स्कूलला प्राधान्य देतात.
    जन्मगावी विकास सेवा संस्था,दूध संस्था,व्यायाम शाळा,सेवा प्रतिष्ठान स्थापन करून गावच्या प्रगतीत योगदान दिले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या संस्थांची यादी खूप मोठी आहे.सर्वच संस्था अग्रेसर आहेत. त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे ऊर्जेचा स्रोत असून संपर्कात येणाऱ्यांना प्रेमानं भारावून टाकणारं आहे.त्यांच्या कर्तृत्व शक्तीला नवीन उंची प्राप्त झाली आहे.संकुचित विचारांना त्यांनी कधी थारा दिलेला नाही.व्यापक सकारात्मक विचार सोबत ठेवले आहेत.
    हजारो लोकांच्या प्रगतशील जीवनशैलीला त्यांची प्रेरणा लाभली आहे.जे करायचं ते उत्तम पारदर्शी अन लोकहिताचे..मग कितीही संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर.त्याचा पाठपुरावा करून त्यात यशस्वी व्हायचेच हा त्यांचा हट्ट असतो.तो निश्चितपणे प्रगतीकडे जाणारा नेणारा असतो.त्यांच्या व्यक्तीमत्व सर्वांना आपलंसं वाटते.सत्तापदे असताना सुद्धा वागण्यात कधी झगमगाट रुबाब मारलेला नाही.त्यांना सुखी,आनंदी,निरोगी आयुष्य लाभो या वाढदिनी शुभेच्छा.
  2.  :माझ्या सहकार,आर्थिक ,शैक्षणिक,सामाजिक वाटचालीतील कार्यात उद्योगपती आदरणीय शंकर पाटीलसाहेब यांचे योगदान प्रचंड आहे.त्यांनी सतत ऊर्जा प्रेरणा देत मला पाठबळ दिले.केडीसीसी बँकेवर संचालक करण्यात त्यांनीच पुढाकार घेतला.त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्हा पतसंस्था फेडरेशनची स्थापना करण्यात आली.संस्थात्मक प्रगतीसाठी त्यांचे मार्गदर्शन सल्ला मिळत गेल्याने संस्थात्मक विस्तार करणे सहज शक्य झाले.दूरदृष्टी,अभ्यासू,नावीन्यतेचा स्वीकार करणारे शंकर पाटील नेहमीच माझ्या साथीला राहिले आहेत त्यांचे आणि माझे ऋणानुबंध घट्ट आहेत अशी कृतज्ञतेची भावना वाढदिवसाच्या निमित्ताने अनिल पाटील यांनी व्यक्त केली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!