आपत्ती व्यवस्थापन काळात मदतीसाठी पुढे धावणाऱ्या संस्थांना बळ देण्याची जबाबारी आपल्या सर्वांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रतिपादन, महायोद्धा पुरस्काराने सन्मान

Spread the news

 

आपत्ती व्यवस्थापन काळात मदतीसाठी पुढे धावणाऱ्या संस्थांना बळ देण्याची जबाबारी आपल्या सर्वांची

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रतिपादन, महायोद्धा पुरस्काराने सन्मान

 

कोल्हापूर

आपत्ती व्यवस्थापन काळात मदतीसाठी पुढे धावणाऱ्या संस्थांना बळ देण्याची जबाबारी आपल्या सर्वांची आहे असे प्रतिपादन माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांनी केले.

व्हाइट आर्मी संघटनेच्या वतीने पवारांना महायोद्धा हा पुरस्कार देवून खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला  उत्तर देताना ते बोलत होते. व्हाईट आर्मी, शिवाजी विदयापीठ व जिल्हा आपत्ती निवारण केंद्रांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पवार म्हणाले, देशात आणि महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी भूकंप, बाँब स्फोट, जातीय दंगली अशा आपत्ती आल्या, त्या त्या वेळी अनेकदा आपण तेथे धावून गेलो. यंत्रणा कामाला लावली. ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन शक्य झाले. राज्यातील सर्वच आपत्ती काळात प्रशासकीय यंत्रणेने चांगले काम केले. अनेक संस्थाही अशावेळी काम करतात. अशा संघटना आणि संस्थांना बळ देण्याची जबाबदारी आपली आहे.

खासदार शाहू महाराज म्ह्णाले, खासदार शरद पवार यांनी भूकंप, बाँब स्फोट यासह अनेक आपत्तीमध्ये केलेले काम अतिशय चांगले आहे. देशात आणि महाराष्ट्रात अनेक प्रकारची संकटं आली. अशावेळी योग्य निर्णय घेत त्यांनी त्या त्यावेळी मदत पोहोचवत आणि यंत्रणा कामाला लावत आपत्ती निवारण केले. त्यामुळे अतिशय योग्य व्यक्तीला हा पुरस्कार दिला आहे. त्यांच्या कार्याचा निश्चितच महाराष्ट्राला अभिमान आहे.

प्रारंभी व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आपत्ती व्यवस्थापनात काम केलेल्या अनेक संघटना आणि संस्थांच्या प्रतिनिधींचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के,  प्रकुलगुरू प्रमोद पाटील, कुलसचिव व्ही.एन. शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील,शहराध्यक्ष आर.के. पोवार, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, सरोज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचलन केले. अमोल कोडोलीकर यांनी आभार मानले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!