प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांच्या ’सुवर्णगंध’ या पुस्तकाचा प्रकाशन समांरभ रविवारी

Spread the news

कोल्हापूर : प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांच्या ’सुवर्णगंध’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवारी, (१९ जानेवारी २०२५) आयोजित केला आहे. कोळेकर तिकटी येथील अक्षर दालन येथे सायंकाळी पाच वाजता हा समारंभ होत आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एन. शिंदे हे प्रमुख पाहुणे आहेत.माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर हे प्रमुख वक्ते तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपसचिव सतीश भारतीय यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील (बेळगाव) हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. या कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाशक अमेय जोशी यांनी केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!