अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा उभारी घेण्याचं काम करूया
पी.एन. पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने खासदार शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
कोल्हापूर : काँग्रेस अडचणीत असताना पक्ष बदलण्याचा विचार कधीही पी एन पाटील यांनी केला नाही. त्यामुळ कार्यकर्त्यांनीही खचून न जाता आपलं काम सुरू ठेवावं. यश अपयश येत असते. पुन्हा एकदा भरारी घेऊया. लोकांच्यासाठी काम करूया. सर्वांना बरोबर घेऊन, धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करण्याचा पी. एन. पाटील यांचा वसा आणि वारसा पुढे सूरू ठेवूया असे आवाहन खासदार शाहू महाराज यांनी केले. दरम्यान, कितीही संकट आली, पराभव झाला तरीही स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांनी पक्षनिष्ठा सोडली नाही. त्यामुळ, विधानसभेतील अपयशाने सर्व काही गेलं. असं न समजता पुन्हा एकदा उभारी घेण्याचं काम, पी.एन. पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने करूया. पराभवाने खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे नवी उभारी घेऊया. असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी, कार्यकर्त्यांना केलं. पी. एन. पाटील यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त आयोजित सर्वपक्षीय अभिवादन सभेत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील बोलत होते.
स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन सभा, जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात संपन्न झाली. खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अभिवादन सभेवेळी, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, पी. एन पाटील यांच्या जाण्यान कोल्हापूरची मोठी हाणी झाल्याची भावना व्यक्त केली. पी एन पाटील यांना मानणारे राज्यभरात कार्यकर्ते होते.. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारे नेतृत्व आणि लोकांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख होती. याशिवाय देशात आणि राज्यभरात काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. पी एन पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी सर्वांनी घेऊया. शिवाय पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा विचार पी. एन. पाटील यांनी जोपासला. त्यांच्या विचाराची मशाल कायम पणे तेवत ठेऊया. अस आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केलं.
पी. एन. पाटील यांच्या विचारांची स्मृती जपताना, एक निष्ठेचा विचार त्यांच काँग्रेसवर असनार प्रेम हे सर्व पुढे घेऊन जाण्याची नैतिक जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारावी. जे काम होत नसेल ते तोंडावरती नाही म्हणायचे. मात्र कधीही कार्यकर्त्याला फसवण्याचे काम पी. एन पाटील यांनी केलं नाही. लोकसभा निवडणुकीवेळी देशात एक वेगळे वातावरण होते. त्या काळातही शाहू महाराज यांना खासदार करून, हे वातावरण बदलण्याचं काम कोल्हापुरातील जनतेन केलं. शिवाय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मते मिळाली. त्यामुळ सर्व काही गेलं असं वातावरण न करता. निराश न होता पुन्हा एकदा उभारी घेण्याचं काम, पी.एन. पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने करूया. पी. एन. पाटील यांची जयंती करताना त्यांचे विचार पुढे घेण्याची जबाबदारी घेऊया. पराभवाने खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे नवी उभारी घेऊया. असं आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी, पी.एन. पाटील यांच्या जयंतीच्या निमित्तान केलं.
खासदार शाहू महाराज यांनी, पी. एन. पाटील यांचं राजकारणातील काम आणि पक्षनिष्ठा, ही सर्वांना भावनारी होती. काँग्रेस अडचणीत असताना पक्ष बदलण्याचा विचार कधीही पी एन पाटील यांनी केला नाही. त्यामुळ कार्यकर्त्यांनीही खचून न जाता आपलं काम सुरू ठेवावं. यश अपयश येत असते. पुन्हा एकदा भरारी घेऊया. लोकांच्यासाठी काम करूया. सर्वांना बरोबर घेऊन, धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करण्याचा पी. एन. पाटील यांचा वसा आणि वारसा पुढे सूरू ठेवूया. अस आवाहनही खासदार शाहू महाराज यांनी केल. माजी आमदार के पी पाटील यांनी, पी.एन. पाटील आणि माझ्या मैत्रीत अंतर आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. एक निष्ठ विचाराची, निष्ठेची परंपरा त्यांनी दाखऊन दिल्याचं सांगितल. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी. पाटील, कॉम्रेड उदय नारकर, कॉम्रेड बाबुराव कदम,कॉम्रेड सतिशचंद्र कांबळे, जनता दलाचे वसंत पाटील, डी.जी. भास्कर, माजी नगरसेविका भारती पोवार या सर्वांनी पी.एन पाटील यांना अभिवादन करताना, पी. एन. पाटील यांच्या सारखा राजकिय नेता पुन्हा होणे नसल्याचं सांगीतल.पक्ष निष्ठा काय असते, याचा वारसा पी.एन.पाटील यांच्याकडून घेण्यासारखा आहे. एक कॉल प्रॉब्लेम सॉल.. अशी त्यांच्या कामाची पद्धत होती अशा अनंत आठवणी यावेळी व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान पी एन पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आल. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, शशिकांत पाटील चुयेकर