खासदार शाहू महाराज यांचा मंगळवारी वाढदिवस
नवीन राजवाडा कार्यालयात स्वीकारणार जनतेच्या शुभेच्छा
कोल्हापूर
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा 77 वा वाढदिवस मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी संपन्न होत आहे. या निमित्य महाराज नवीन राजवाडा कार्यालय येथे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत खासदार शाहू महाराज यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. राजकीय क्षेत्रात प्रवेश करत तब्बल दीड लाख मताने लोकसभेवर निवडून गेले. कोल्हापूरकरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत संसदेत पाठवले.
खासदार झाल्यानंतर त्यांचा पहिलाच वाढदिवस आहे.
गेल्या सहा महिन्यात खासदार म्हणून कोल्हापूरच्या विविध प्रश्नावर त्यांनी लोकसभेत आवाज उठवला. विविध प्रश्न मार्गी लागावेत यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्नही केले.
शाहू महाराज यांचा मंगळवारी वाढदिवस आहे. महाराज हे नवीन राजवाडा येथील कार्यालयात सकाळी दहा ते दोन व सायंकाळी पाच ते सात या वेळेत शुभेच्छा स्वीकारणार आहेत.