चेंबर ऑफ कॉमर्सचे पुरस्कार जाहीर
रायबागे, शहा, शेख, पोरे, बनछोडे यांचा समावेश
चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांची घोषणा
कोल्हापूर: कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सन २०२४ च्या पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष संजय शेटे यांनी केली. यामध्ये ‘कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार’ हा उद्योजक भानुदास रायबागे, ‘कै. बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार’ हा उद्योजक मुबारक शेख, ‘कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार’ उद्योजिका शकुंतला बनछोडे, ‘कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार-उद्योग पुरस्कार’ उद्योजिका सीमा शहा व उद्योजक संदीप पोरे यांना जाहीर झाला. पुरस्कारांचे वितरण गुरुवारी (ता. ९) दुपारी चार वाजता गायन समाज देवल क्लब, खासबाग येथे होणार आहे.
संजय शेटे म्हणाले, ‘ मानपत्र, स्मृतिचिन्ह, शालअसे या पुरस्कारांचे स्वरूप असून मान्यवरांच्या हस्ते त्यांचे वितरण होणार आहे. या पुरस्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे चेअरमन मोहन गुरुनानी, प्रेसिडेंट दीपेन आगरवाल उपस्थित राहणार आहेत. ते ‘व्यापार, उद्योगातील आव्हाने संधी व संघटनेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करणार
सीमा शहा
संदीप पोरे
पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष धनंजय दुमणे, माजी अध्यक्ष आनंद माने, मानद सचिव जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, प्रशांत शिंदे, अजित कोठारी, खजानीस राहुल नष्टे, संचालक संपत पाटील आदी उपस्थित होते.
आहेत. प्रमुख उपस्थिती माजी आमदार व शिवसेना (शिंदे गट) उपनेत्या जयश्री जाधव, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, दि ऑल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांची असणार आहे.
स शु स