सामाजिक कार्यकर्ते सागर रंगराव पाटील यांनी एक कोटीची जमीन एकटी संस्थेला केली दान…*

Spread the news

*सामाजिक कार्यकर्ते सागर रंगराव पाटील यांनी एक कोटीची जमीन एकटी संस्थेला केली दान…*

 

कोल्हापूर

एकटी संस्था ही गेली १२ वर्षे विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत, बेघर, निराधार महिलांसाठी कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. वडणगे येथे सामाजिक कार्यकर्ते सागर रंगराव पाटील यांनी जमीन एकटी संस्थेला केली दान.
मृत्यूनंतरही तुमचं कार्य चिरतरण राहील. यासाठी माणसाने माणूसकीचा धर्म जोपासत गोर गरीब, निराधार लोकांना मदतीसाठी प्रयत्न करावेत. असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते सागर रंगराव पाटील यांनी केलय.
सागर पाटील यांनी त्यांच्या मालकीची जमीन एकटी संस्थेला दान दिली आहे.
त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापुरातील शाहूपुरी येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते, सागर रंगराव पाटील यांनी, वडणगे- निगवे रोडवरील त्यांच्या मालकीची पाच गुंठे जमीन एकटी संस्थेला दान दिली आहे. एक आगळी वेगळी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी जमीन, त्यांचे वडील रंगराव पाटील यांच्या स्मरणार्थ दान केली. याठिकाणी एकटी संस्थेच्या माध्यमातून, अण्णा- माई सेवासदन सुरू करण्यात आलय. या जागेच्या उद्घाटन कार्यक्रम आज सोमवारी पार पडला. वडणगेच्या सरपंच संगीता पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. तर गीतादेवी रंगराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील यांनी, पद, पैसा, प्रतिष्ठा, याहीपेक्षा आयुष्यात गोरगरिबांची सेवा करणे हाच खरा माणुसकी धर्म असल्याचं सांगितलं. बेघर, निराधार लोकांची सेवा करणे, यासाठी उर्वरित आयुष्यात काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय एकटी संस्थेच्या कामात शक्य होईल, तेवढा सक्रीय सहभाग घेण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. मृत्यूनंतरही तुमचं कार्य चिरंतर राहील. यासाठी माणसाने माणूसकीचा धर्म जोपासत गोर गरीब, निराधार लोकांना मदतीसाठी प्रयत्न करावेत. असं आवाहनही सागर पाटील यांनी केल. वडणगेच्या सरपंच संगीता पाटील यांनी, समाजातील माणुसकी हरवत चालली असताना सागर पाटील यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांन एवढ्या मोठ्या किंमतीची जमीन एका सेवाभावी संस्थेला दान देणे, आदर्शवत असल्याचं सांगितलं. अशाप्रकारचे दातृत्व दाखऊन, बेघर, निराधार लोकांच्या करिता सागर पाटील यांनी फार मोठे योगदान दिल्याचंही त्यांनी सांगितलं. एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी, निराधार, वयोवृध्दांसह समाजातील विविध गरजू समाजघटकांसाठी काम करत असताना, या लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, सागर पाटील यांच्यासारख्या लोकांनी दाखवलेल्या दातृत्वामुळे, एकटी संस्थेला अधिक चांगल्या प्रकारे काम करता येत असून निराधार आणि बेघर लोकांना निवारा देण्याचं स्वप्न हे सागर पाटील यांच्यामुळे पूर्ण झाल्याचं अनुराधा भोसले, अध्यक्षा , एकटी संस्था यांनी सांगितल. समाजात माणुसकी जिवंत असल्याचा वस्तू पाठ सागर पाटील यांनी जगाला दाखवून दिला आहे. असे गौरवोउद्गार त्यांनी काढले. डॉ. अजित देवणे यांनी, अण्णामाई सेवासदन मधील गोरगरीब निराधार लोकांच्या औषध उपचाराचा खर्च मोफत करणार असल्याचे सांगितल.यावेळी, डॉक्टर अमरसिंह रजपूत ,एकटी संस्थेचे सल्लागार जैनुद्दीन पन्हाळकर, तलाठी प्रकाश महाडेश्वर यांनी देखील मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा कांबळे यांनी केले.या कार्यक्रमावेळी, एस न्युजचे पत्रकार इकबाल रेठरेकर, एकटी संस्थेचे अक्षय पाटील, पुष्पा कांबळे, पुष्पा पठारे,जगदीश कांबळे,सविता कांबळे , अभिजीत कांबळे शुभम कामत,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!