कोल्हापूर
सुमधुर आवाजाने संपूर्ण जगावर मोहिनी घातलेला गायक म्हणजे किशोर कुमार. फक्त गायकच नाही तर निर्माता ,दिग्दर्शक, पटकथा लेखक ,संगीतकार आणि मुख्य म्हणजे अभिनेता अशा कितीतरी पैलूंनी भारलेलं रत्न म्हणजे किशोर कुमार. त्यांच्याच गाण्यांची मेजवानी दर्पण फाउंडेशन च्या वतीने दोन जानेवारीला मिळणार आहे.
दर्पण फाउंडेशनचे विक्रांत पिसे आणि राम भोळे हे ही खास मेजवानी घेऊन येणार आहेत गुरुवार दि.2 जानेवारी 2025 रोजी सायं. 5 वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर, देवल क्लब, कोल्हापूर येथे हा विशेष कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये किशोर कुमार यांच्या आवाजाचा हुबेहूब भास करून निर्माण देणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गायक प्रा.अनिल कुमार घाटगे,पुणे आणि पुण्याची प्रख्यात गायिका राही शेंडगे हे आपला स्वर साज चढवणार आहेत.
या कार्यक्रमाची निर्मिती कोल्हापूरचे सुप्रसिद्ध गायक राम भोळे आणि उदयोन्मुख गायक विक्रांत पिसे यांची असून दर्पण फाऊंडेशन कोल्हापूर यांची प्रस्तुती आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका योगिता पाटील आणि स्नेहलता सातपुते उदयोन्मुख गायक कुमार पाटील आणि उदयोन्मुख गायिका निशा देसाई हे आपली गायन कला सादर करणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक फैय्याज नरवाडे करणार आहेत. या कार्यक्रमासाठीचे डिझाईन दर्पण फाउंडेशनचे संचालक व नक्षत्र ग्राफिक्स चे श्रीपाद रामदासी यांनी केले आहे. कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन व लाईट संजय नलवडे यांचे कडे आहे.
सर्वांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजकांमर्फत आवाहन करण्यात येत आहे.