न्यूज बुलेटीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – विजयसिंह माने* _*अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये न्यूज बुलेटीनचे प्रकाशन*_

Spread the news

*न्यूज बुलेटीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी – विजयसिंह माने*

_*अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये न्यूज बुलेटीनचे प्रकाशन*_

वाठार तर्फ वडगाव – श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये त्रैमासिक न्यूज बुलेटीनचे प्रकाशन संस्थाध्यक्ष विजयसिंह माने यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाशनप्रसंगी बोलताना विजयसिंह माने म्हणाले, “महाविद्यालयातर्फे प्रकाशित करण्यात येणारे न्यूज बुलेटीन हे विद्यार्थी तसेच शिक्षकांना प्रेरणादायी व दिशादर्शक ठरेल. याद्वारे समाजामधील विविध घटकांना महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या नवनवीन उपक्रमांची माहिती होईल.” कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी प्रमुख उपस्थित होते.

उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी म्हणाले, ” सदर न्यूज बुलेटीन द्वारे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, संशोधन अशा क्षेत्रांतील विविध उपक्रम तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी केलेल्या विशेष कामगिरीची नोंद होणार आहे.”

जनसंपर्क अधिकारी डॉ. दिग्विजय पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी महाविद्यालयातील डीन डॉ. एस. एस. पाटील, डॉ. जे. एम. शिंदे, डॉ. एच. व्ही. शेटे,‌ डॉ. बी. ए. जाधवर, डॉ. एस. एस. सुतार, प्रा. एम. ए. सुतार, प्रा. एस. एच. शेटे, प्रा. ए. ए. सुर्यवंशी, डॉ. एस. एस. सरडे, प्रा. पी. एस. लाडगांवकर आदी उपस्थित होते.

*फोटो कॅप्शन -* अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या न्यूज बुलेटीनचे प्रकाशन करताना संस्थाध्यक्ष विजयसिंह माने, सोबत उपप्राचार्य प्रा. पी. बी. घेवारी, डॉ. दिग्विजय पवार, डॉ. जे. एम. शिंदे, डॉ. एस. एस. पाटील व इतर प्राध्यापक वर्ग.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!