प्रश्नांची उकल करणारी सकारात्मक तरुणाईच विकसित भारत घडवेल- अभय जेरे केआयटी मध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२४ उत्साहात संपन्न

Spread the news

 

 

प्रश्नांची उकल करणारी सकारात्मक तरुणाईच विकसित भारत घडवेल- अभय जेरे
केआयटी मध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२४ उत्साहात संपन्न.

येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयामध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, शिक्षण मंत्रालयाचा इनोव्हेशन सेल व शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रेल्वे मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय यासारख्या अन्य काही महत्त्वाच्या मंत्रालयांच्या सहकार्याने आयोजित स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२४ या स्पर्धेचा समारोप काल रात्री एआयसीटीई चे उपाध्यक्ष व केंद्र शासनाच्या इनोव्हेशन सेल चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अभय जेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सर्वच क्षेत्रांमध्ये जगामध्ये होणारे बदल हे अत्यंत वेगवान पद्धतीने मार्गक्रमण करत आहेत. आपापल्या कौशल्या प्रमाणे लोक नोकरी वरती अवलंबून न राहता वेगवेगळ्या संस्थांमध्ये मर्यादित कालावधीच्या छोट्या मोठ्या प्रोजेक्ट्स च्या माध्यमातून योगदान देत आहेत. सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाला अवगत करत सृजनशील कल्पनेच्या माध्यमातून स्वतःची प्रगती करून घेत आहेत. भविष्यातील आव्हानांचा विचार करून कमीत कमी वेळेमध्ये,कमी खर्चामध्ये प्रश्नांची उकल करणारा अभियंता ही काळाची गरज बनलेली आहे. ज्या वेगाने जग बदलत आहे त्या वेगाने स्वतःच्या कौशल्यांचा विकास करून विकसित भारतामध्ये योगदान दिले पाहिजे असे आवाहन श्री. अभय जेरे यांनी उपस्थित तरुणाईला केले.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेची विस्तृत माहिती सुरुवातीलाच संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी उपस्थितांना करून दिली.देशभरातील १४ राज्यातून ३१ संघ १८६ विद्यार्थी ३० मार्गदर्शक प्राध्यापक उपस्थित झाले होते. विविध क्षेत्रातील १६ परीक्षकांनी या सर्व स्पर्धेतील प्रकल्पांचे परीक्षण केले. स्पर्धक विद्यार्थी,प्राध्यापकांनी अभिप्रायातून आयोजनाबद्दल,व्यवस्थे बाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.या कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून मेटलासा प्रा.ली पुणे चे उपाध्यक्ष श्री उपेंद्र भाळवणीकर उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. अभय जेरे व श्री उपेंद्र भाळवणीकर, संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली, सचिव श्री दीपक चौगुले, यांच्या हस्ते तर स्पर्धेचे निरीक्षक श्री. प्रसाद दिवाण, श्री.उमेश राठोड, प्रा.अरुण देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. नोडल सेंटर समन्वयक प्रा. अजय कापसे यांनी आभार प्रदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रुती काशीद यांनी केले. या सलग ३६ तास चाललेल्या स्पर्धेच्या नियोजनासाठी ५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व १५० विद्यार्थी स्वयंसेवक अहोरात्र झटत होते.

फोटो तपशिल:-
१) केआयटी येथे आयोजित स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या समारोप व बक्षीस समारंभाच्या निमित्ताने उपस्थित स्पर्धकांची संवाद साधताना मुख्य अतिथी श्री.अभय जेरे यांच्या सोबत अन्य अतिथी, स्पर्धा निरीक्षक संस्थेचे विश्वस्त,प्राध्यापक .

२-४ ) केआयटी येथे आयोजित स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या समारोप व बक्षीस समारंभाच्या निमित्ताने विजेत्या संघांचे अभिनंदन करताना श्री.अभय जेरे सोबत अन्य अतिथी,स्पर्धा निरीक्षक संस्थेचे विश्वस्त,प्राध्यापक.

विजेत्या संघांचा तपशील
१) नर्डदेव- श्रीकृष्ण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, तमिळनाडू
२) टीम पीओव्ही- डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेंगलुरू
३) सोर्सेसर-पानिपत इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, हरियाणा
४) कॅपॅटीव्हेटर ३.0, महाराष्ट्र अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग संगमनेर,महाराष्ट्र.
५) प्रवाह-२९, मिहीर्स एमआयटी अकॅडमी ऑफ इंजीनियरिंग आळंदी देवाची,महाराष्ट्र.
६) एलडी-हकॉस, चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तमिळनाडू.
७) मॅनिफेस्ट कोडर, तमिलनाडु चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तमिळनाडू.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!