गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध

Spread the news

 

गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ सौंदत्ती येथे भाविकांसाठी उपलब्ध

 

कोल्‍हापूर, ता.११: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रे निमिताने गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेवून जाणाऱ्या गाडीचे पूजन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते ओढ्यावरील रेणुका मंदिर, कोल्हापूर येथे करण्यात आले व त्यानंतर गाडी सौंदत्ती येथे रवाना करण्यात आली.

बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका देवीची यात्रा ११ डिसेंबर २०२४ ते १५ डिसेंबर २०२४ इ. रोजी होत असून महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून लाखो भाविक जात असतात यामध्ये कोल्हापूर व ग्रामीण भागातून जाणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय असते. सौंदत्ती येथे यात्रा काळात पूजा अर्चा, चहा पाणी, नैवेद्यासाठी गोडधोड प्रसाद हे नित्यनेमाचे कार्यक्रम होत असतात. यासाठी गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थाची आवश्यकता असते. यासाठी गेली दोन वर्षे गोकुळमार्फत यात्रेकरूनच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत सौंदत्ती येथे गोकुळचे दूध व दूधजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. त्याला भरगोस प्रतिसाद मिळाला असून या वर्षीच्या यात्रेमध्ये हि गोकुळची दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देत असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.

गोकुळने सौंदत्ती येथे भाविकांसाठी आमच्या मागणीनुसार गुणवत्तापूर्ण दूध, श्रीखंड, बासुंदी, लस्सी, दही,ताक, तूप, दूध पावडर असे दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध केलेबद्दल भाविकांच्यावतीने गोकुळ परिवाराचे आभार व्यक्त केले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग अधिकारी हनमंत पाटील लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ अध्यक्ष सौ.अनिता पोवार, सुरेश बिरबोळे, विजय पाटील, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्ष अशोकराव जाधव, सुभाष जाधव, दयानंद घबाडे, अच्युतराव साळोखे, तानाजी चव्हाण, मोहन साळोखे, किरण मोरे, प्रशांत खाडे, श्रीकांत कारंडे, संजय मांगलेकर, उदय पाटील, बाबुराव पाटील, कृष्णात सुतार, शिवाजी देवकर, प्रदीप साळोखे, संघटनेचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

—————————————————————————————————-

फोटो ओळ – सौंदत्ती यात्रेनिमित्त गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणाऱ्या गाडीचे पूजन करताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील, संभाजी पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग अधिकारी हनमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदूम, संघटनेचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

—————————————————————————————————-

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!