*राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँकेस बँको ब्ल्यू रिबन- 2024 पुरस्कार जाहीर….*
*अध्यक्ष एम.पी. पाटील यांची माहिती….*
*25 पुरस्कार पटकावणारी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक…..*
कागल / प्रतिनिधी
सहकारातील आदर्श स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने कार्यरत असलेल्या व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ,सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या येथील राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँकेस उत्कृष्ट कामकाजाबद्दल 2023/24 सालचा “ब्ल्यू रिबन” 2024 पुरस्कार आज जाहीर झाला आहे.
या पुरस्कारामुळे बँकेस आजपर्यंत मिळालेल्या एकूण पुरस्कारांची संख्या 25 इतकी झालेली आहे. सदरचा पुरस्कार देशभरातील सर्व नागरी बँकांमधून बॅंकांच्या कामकाजांचे योग्य मूल्यमापन करून देण्यात येतो. “बँको समिती” या राष्ट्रीय समितीमार्फत सदर पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वितरण माहे जानेवारी 2025 मध्ये लोणावळा येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
*कोट* —–
*स्वर्गीय राजेंच्या पंचसूत्रीमुळेच बँकेची यशस्वी घोडदौड…. एम.पी.पाटील….*
पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील म्हणाले, राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सन 23-24 या आर्थिक वर्षासाठी मिळालेला हा पुरस्कार आमच्यासाठी विशेष आहे. या आर्थिक वर्षात बँकेने 500 कोटींच्या ठेवींचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. शिवाय हा 25 वा (रौप्य ) पुरस्कार आहे. येथे स्मरण होते ते आमचे प्रेरणास्थान स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांची. ते म्हणत सभासदांचा, ठेवीदारांचा, विश्वास जपणे यातच बँकेची प्रगती दडलेली आहे. बँकिंग क्षेत्रात विश्वास, सुयोग्य नियोजन, तत्काळ सेवा,पारदर्शी कारभार, आणि काटकर ही पंचसूत्री अत्यंत महत्त्वाची आहे. तेच सूत्र आम्ही संचालक मंडळ सदस्य, तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी जपल्यामुळेच आज या बँकेचा एन.पी.ए. शुन्य % ठेवण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. या यशाचे भागीदार, बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार व्हाईस चेअरमन, सर्व सहकारी संचालक, कार्यकारी संचालक जनरल मॅनेजर अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे.