मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवडीबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव
कोल्हापूर दि 4 महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवडीबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने मिरजकर तिकटी या ठिकाणी जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी भाजपच्या वतीने थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती.
भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देवेंद्रजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत एकमेकांना मिठाई भरून हा आनंदोत्सव साजरा केला.
देवेंद्रजी यांनी शपथ घेताच
कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी राहुल चिकोडे, गायत्री राऊत, अजित ठाणेकर,
हेमंत आराध्ये, भाऊ कुंभार, अमोल पलोजी, गणेश देसाई, विजय खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, अतुल चव्हाण, अवधूत भाट्ये, धनश्री तोडकर, रश्मी साळोखे, सुजाता पाटील, श्वेता गायकवाड, अमर साठे, नचिकेत भुर्के, प्रकाश घाटगे, विजय दरवान, राजाराम परीट, प्रताप देसाई, अमित कांबळे, सचिन बिरंजे, कोमल देसाई, रोहित कारंडे, नितीन सांगवडेकर, योगेश जोशी, संतोष जोशी, अनुराधा गोसावी, दीपा ठाणेकर, ऋतुराज नढाळे, अमित टिकले, बंडा गोसावी, स्वप्नील निकम, राजू जाधव, दिलीप मैत्राणी, मंगला निप्पानीकर, सुदर्शन सावंत, विशाल शिराळे, दिलीप बोन्द्रे, तानाजी निकम, तानाजी रणदिवे, अनिरुद्ध कोल्हापूरे, प्रसाद नरुले
यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.