रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर  सिटीच्या किल्ला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद, विजेत्यांना बक्षीस

Spread the news

 

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर  सिटीच्या किल्ला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद, विजेत्यांना बक्षीस

कोल्हापूर

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटी तर्फे दिनांक 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2024 या कालावधीत दिवाळी किल्ला स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये कोल्हापूर शहरांमधून 20 मंडळ तसेच वैयक्तिक युवक युवतींनी यांनी सहभाग नोंदवला होता. क्लब तर्फे नेमण्यात आलेल्या कमिटी ने पहिले 5 क्रमांक काढून त्यांना रोख बक्षीस आणि प्रशस्तिपत्र देणेत आले तसेच इतर सर्व सहभागी प्रतिस्पध्र्याना प्रशस्तिपत्र देणेत आले. या स्पर्धेमध्ये हिंदवी ग्रुप स्पोर्ट्स क्लब, कदम वाडी रोड, विचारे माळ यांना पहिला क्रमांक देणेत आला त्यांना रोख रुपये 5000, शील्ड आणि प्रशस्तिपत्र प्रदान करनेत आले.

 

दुसर्‍या क्रमांकावर जय हनुमान भक्त मंडळ, जाधववाडी, तिसर्‍या क्रमांकावर जुना बुधवार तालीम मंडळ प्रणित फायटर्स स्पोर्ट्स, चौथ्या क्रमांकावर महाकाली तालीम मंडळ भजनी मंडळ, छ शिवाजी पेठ, आणि पाचव्या क्रमांकावर किल्ला बॉइज, पाचगाव यांचा देखील रोख बक्षीस व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करणेत आला. या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे कामगार आयुक्त श्री विशाल घोडके हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवाजी महाराज यांच्या वर भाषण स्पर्धा ठेवली होती त्याला सुद्धा युवक आणि युवती यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले घोडके साहेबांनी शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास पुन्हा एकदा उजळून सांगितला तसेच सहभागी नागरिकांना सामाजिक न्याय, दुर्लक्षित घटका कडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन यावर त्यांनी केलेले कार्य यावर संबोधन केले याच बरोबरीने स्पर्धेत सहभागी सर्वाचे कौतुक केले.
क्लब तर्फे आयोजित दिवाळी किल्ला स्पर्धेचे जरी हे पहिले वर्ष असले तरी यावर्षी मिळालेला उत्स्फूर्त सहभाग बघता इथून पुढे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करणेचे क्लब तर्फे ठरवणेत आले आहे.
या समारंभास क्लबचे अध्यक्ष श्री विलास रेडेकर, सचिव श्री रवि जाधव, खजिनदार सीए आलोक शाह, सीए नितीन हरगडे, श्री अभिजीत पिंपळकर, श्री किरण पवार, श्री श्रीनिवास मालू, श्री दीक्षित श्री उपाध्ये, श्री नलावडे आणि इतर सदस्य तसेच सर्व नागरिक उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!