देवदर्शन होऊन येताना अपघात, पती-पत्नी ठार

Spread the news

देवदर्शन होऊन येताना अपघात, पती-पत्नी ठार

कोल्हापूर

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीतीरावरील वरदविनायकाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना डंपर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यू झाला. त्यामध्ये सौ. सुनिता संजय वडींगे (वय 55 रा. रिंगरोड मंगळवार पेठ) या जागीच ठार झाल्या. तर इचलकरंजी होमगार्ड उपपथकाचे निवृत प्रभारी अधिकारी संजय सदाशिव वडींगे (वय 58) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सोमवारी सकाळच्या सुमारास येथील यशोदा पुलानजीक ही दुर्घटना घडली.

 

संजय वडींगे हे इचलकरंजी होमगार्ड उपपथकाचे प्रभारी अधिकारी म्हणून गेली अनेक वर्षे कार्यरत होते. पंधरा दिवसांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे संजय आणि सुनिता वडींगे हे दाम्पत्य आपल्या दुचाकीवरुन (क्र. एमएच 09 एटी 0604) वरुन पंचगंगा नदीतीरावरील वरदविनायकाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन हे दाम्पत्य घराकडे परतत होते. येथील यशोदा पुलानजीक ते आले असताना त्यांच्या पाठीमागून डंपर (क्र. एमएच 09 एफएल 5418) येत होता. अचानकपणे वडींगे दाम्पत्याची दुचाकी घसरली आणि पाठीमागून येणार्‍या डंपरचे चाक सुनिता वडींगे यांच्या डोक्यावरुन आणि संजय वडींगे यांच्या कंबरेवरुन गेले. त्यामध्ये सुनिता वडींगे या जागीच ठार झाल्या. तर गंभीररित्या जखमी झाले उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!