कोल्हापुरातल्या स्वाभिमानी पेठांच्या पाठिंब्यावर लाटकर आमदार होणार – रविकिरण इंगवले*

Spread the news

*कोल्हापुरातल्या स्वाभिमानी पेठांच्या पाठिंब्यावर लाटकर आमदार होणार – रविकिरण इंगवले*

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सर्वच पेठा या आपापल्या स्वाभिमान जपत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांची विचारसरणी अवलंब आहेत. या स्वाभिमानी पेठांच्या पाठिंब्यावर राजेश लाटकर आमदार होणार असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी व्यक्त केला. खरंतर खाल्ल्या मिठाला जागणे आणि उपकार जाणून काम करणे हे कोल्हापूरच्या सर्वच पेठांचं वैशिष्ट्य आहे. ज्यांनी मोठं केलं त्यांच्याबद्दल कायम कृतार्थता बाळगणे ही छत्रपती शिवरायांची शिकवण कोल्हापुरातल्या सर्वच पेठाने व त्यांच्या रांगडेपणानी नेहमी प्राणपणाने सांभाळली. पण ज्या क्षीरसागरांना उद्धव साहेबांनी पद, पैसा, प्रतिष्ठा आणि सत्ता दिली त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मोठा झालेल्या क्षीरसागरांना पेठेतील जनता कशी मत देईल? महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारासाठी आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. खरंतर या कोल्हापूरातला सर्वच पेठा स्वाभिमानांची खाण असून एकमेकाला सांभाळत स्वतःच सत्व आणि तत्व जपत एकमेकाला मदत करण्याचा हातखंड असणाऱ्या या स्वाभीमानी कोल्हापूरला गद्दारी कधीच रुचली नाही. म्हणूनच 2019 सालच्या निवडणुकीमध्ये या सर्वच पेठांनी मिळून या गद्दाराविरुद्ध एल्गार केला आणि स्वार्थी विश्वासघातकी प्रवृत्तीला पराभूत केलं. खरंतर एक सामान्य कार्यकर्ते यापासून सुरू झालेला क्षीरसागरांचा प्रवास हा सात गाड्या, कोट्यावधी रुपयाची इस्टेट आणि ठिकठिकाणी पसरलेल्या जमिनी एवढा गोलमाल करून अजुनही सुरू आहे. खरंतर एक साधा कार्यकर्त्या एवढा मोठा कसा होतो हे गौडबंगाल असलं तरी ते उघड सत्य आहे. ज्या उद्धव साहेबांनी एका सामान्य कार्यकर्त्याला सत्तेची संधी दिली तोच आज कार्यकर्ता वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक चौकात उभारून उद्धवजींच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. खरंतर ज्यांनी आपल्याला दिलं त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे हा स्थायीभाव असताना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जाहीर वक्तव्य करत फिरणाऱ्या या कपाळकरंटा उमेदवाराला सर्वच पेठा नाकारून आपला स्वाभिमान जपतील असे इंगवले म्हणाले. राजकारणामध्ये कीतीही मतभेद असले तरी दिल्या घरचे वासे मोजू नयेत अशी संस्कृती परंपरा जपणारे हे कोल्हापूर या कृतघ्नपणान वावरणाऱ्या क्षीरसागरना या निवडणुकीमध्ये सणसणीत उत्तर देऊन कोल्हापूरच्या इतिहासामध्ये व या निवडणुकीमध्ये गद्दारीला या स्वाभिमानी कोल्हापुरात स्थान नाही हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवतील. स्वाभिमानी पेठा या गद्दार वृत्तीला भुईसपाट करून राजेश लाटकर यांच्यासारख्या एका सर्वसामान्य आणि साध्या कार्यकर्त्याला कोल्हापुरात निवडून आणून देऊन एक नवीन इतिहास घडवतील आणि उद्धवजींशी केलेल्या गद्दारीचा सडेतोड बदला घेतील असे प्रतिपादन रविकिरण इंगवले यांनी केले. यावेळी बोलताना उमेदवार राजेश लाटकर म्हणाले, कोल्हापूर शहराचा शाश्वत विकास घडविण्याबरोबरच पेठापेठातील नियोजनबद्ध कामे करण्यासाठी माझ्यासारख्या महापालिकेत काम केलेल्या कार्यकर्त्याला तुमचे मतदान रूपी बहुमत द्या आणि मला आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या. आमदार हे एक संविधानिक पद आहे. मी जरी आमदार झालो तरी तुमच्यातील मी एक असणार आहे. तुम्ही कुठेही आणि कधीही मला जाब विचारू शकता. तुम्ही विरोधी उमेदवाराला दहा वर्षे संधी दिली आता मला पाच वर्षे संधी देऊन होणारे कार्य बघा अशी विनंती लाटकर यांनी केली. यावेळी उपशहरप्रमुख धनाजी दळवी, सुरेश कदम, दत्ताजी टिपुगडे, वाहतूक प्रमुख दिनेश परमार, महिला आघाडी प्रमुख जाहीदा खान, दीपा शिंदे, उपशरप्रमुख सागर साळुंखे, शिवदूत दीपक गौड, स्वरूप मांगले, रवींद्र साळुंखे, दिपा शिंदे, पुनम फडतारे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!