-
राहुल पाटील यांना पन्हाळ्यातून विक्रमी मताधिक्य दया
आ . सतेज पाटील
पी एन यांच्या निष्ठेला न्याय देण्याचे आवाहन
यवलूज :
स्वर्गीय पी एन पाटील यांनी आपल्या आयुष्यातील पन्नास वर्षे गोरगरिबांच्या सेवेसाठी वेचले आहेत .या निष्ठावंताचा पुत्र तुमच्या आशीर्वादावर निवडणूक लढवत आहे .करवीरच्या निवडणुकीत एकीकडे पन्नास वर्षे काँग्रेस व लोकांशी निष्ठावंत असणाऱ्या घराण्यातील मुलगा राहुल पाटील उभा आहे तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केलेला उमेदवार उभा आहे .राहुल पाटील यांना गगनबावडा जुने करवीर व सांगरूळ मधून मताधिक्य निश्चित आहे .त्यामुळे पन्हाळा तालुक्यात राहुल पाटील यांना विक्रमी मताधिक्य देऊन ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार व्हा व स्वर्गीय पी एन पाटील यांच्या निष्ठेला न्याय द्यावा .असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ .सतेज पाटील यांनी केले .
यवलूज ता पन्हाळा येथे करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पी पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. स्वर्गीय पी एन पाटील यांनी प्रचंड काम उभे केले आहे . त्यांचा प्रगल्भ वारसा राहुल पाटील यांच्याकडे आहे .पन्हाळा तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वाभिमानी वारसा आहे . .येथील स्वाभिमानी जनता गद्दारांना कधी थारा देणार नाही .दबावाला अथवा पैशाला भीक घालणारी नाही .त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता राहुल पाटील यांना प्रचंड मताधिक्य द्या .कोणी दबाव आणला तर तुमच्या मदतीला बंटी पाटील हजर आहे असे त्यांनी सांगितले .चंद्रदीप नरके यांचा नामोल्लेख न करता कुंभी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंटी पाटलांची गरज का भासली हे एकदा जाहीर करा .असे आव्हान दिले . राहुल यांना आज पर्यंत मिळालेला प्रतिसाद पाहता विरोधकांचा पराभव अटळ आहे. असे सांगितले .
यावेळी बोलताना उमेदवार राहुल पाटील यांनी विरोधकांच्या पापाचा घडा भरला असून विकासाच्या मुद्द्यावर बोलणे ऐवजी पातळी सोडून हिन भाषा वापरत आहेत .या गद्दारांना करवीरचा स्वाभिमानी मतदार पराभूत करणारा असून निष्ठा व गद्दारीच्या या लढाईत तुमच्या सर्वांच्या पाठबळावर मी लढत आहे मला आशीर्वाद द्या.असे आवाहन केले .
यावेळी बोलताना गोकुळचे संचालक डॉ.चेतन नरके म्हणाले, दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांनी पन्हाळा तालुक्यासाठी भरघोस निधी देऊन विकासाला चालना दिली आहे .चंद्रदीप नरके यांनी पन्हाळ्यासाठी काहीही केलेले नाही . राहुल पाटील यांना आमदार करण्यासाठी कुठेही कमी पडू नका .सतेज पाटील माझे बोट धरून राजकारणात आले आहेत असा कांगावा विरोधक करत आहेत . ते ज्यांच्या बोटाला धरून राजकारणात आले त्यांचे नाव घेताना त्यांना कशाची लाज वाटते ? अशी टीका केली .
यावेळी डी.जी.भास्कर, दादू कामिरे, शशिकांत आडनाईक, बाजीराव देवाळकर, सुहास राऊत, भरत मोरे यांची भाषणे झाली.
गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, संभाजीराव पाटील, उदयानीदेवी साळुंखे, अंबाजी पाटील, बबनराव रानगे, बी.एच.पाटील, दादा पाटील, राहुल पोवार, निवास पाटील उपस्थित होते. श्रीकांत बोरे यांनी स्वागत केले.
चौकट
उच्चांकी गर्दी
यवलुज येथील या सभेने यापूर्वीच्या प्रचार सभांचे सर्व विक्रम मोडीत काढले .व्यासपीठांसमोर प्रचंड गर्दी झाली होती .त्यामुळे आजूबाजूच्या घरांच्या गॅलरीत व घराच्या गच्चीवर देखील कार्यकर्ते युवक व अबाल वृद्धांनी प्रचंड गर्दी केली होती .पाटील यांनी गर्दी एवढीच का ? असे म्हणतात कार्यकर्त्यांनी वर बघा ! वर बघा ! असा जोरदार जयघोष केला.
फोटो कॅप्शन
यवलुज ता पन्हाळा येथील जाहीर प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ . सतेज पाटील उमेदवार राहुल पाटील समोर उपस्थित प्रचंड जनसमुदाय
previous post