राधानगरी मतदार संघात शिवछत्रपतींची भगवी लाट; आमदार आबिटकर उच्चांकी मतांनी विजयी होतील खासदार – खासदार धैर्यशील माने
गारगोटी विराट प्रचार सभा
गारगोटी प्रतिनिधी,
आमदार प्रकाश आबिटकर यांनी कर्मच आपला धर्म मानून मतदार संघाच्या विकासासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. मतदार संघाच्या विकासाला साथ देण्यााठी जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे राधानगरी मतदार संघात शिवछत्रपतींची भगवी लाट तयार झाली असून आमदार प्रकाश आबिटकर उच्चांकी मताधिक्याने पुन्हा निवडून येतील असता विश्वास खासदार धैर्यशिल माने यांनी गारगोटी (ता.भुदरगड) येथील हुतात्मा चौकातील आयोजित केलेल्या विराट सभेत बोलताना व्यक्त केला. अध्यक्षस्थानी जेष्ठनेते बी.एस.देसाई होते. तर प्रमुख उपस्थित कोकण केसरी के.जी.नांदेकर, प्रा.बाळकाका देसाई उपस्थित होते.
पुढे बोलताना खा.माने म्हणाले, स्वत:च्या कुटुंबाकडे लक्ष न देता राधानगरी मतदार संघ हा आपले कुटुंब मानून काम करणारे आ.आबिटकर हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार असल्याचा गौरवपुर्ण शब्दात उल्लेख करून मतदार संघाला पुढे घेऊन जाण्याची हिम्मत केवळ त्यांच्या मध्येच आहे. देव सुध्दा सांगेल आमदार हे आबिटकरच असले पाहिजेत. कोणताही स्वार्थ न मानता सामान्य माणूस केंद्रबिंदू काम केले आहे. त्यांना डोंगर वाड्या-वस्त्यांवरील लोकांची चांगलीच कणव आहे. सामान्य माणसांची सुख-दुख पाहिली आहेत. त्यामुळेच राज्यातील 288 आमदारांमध्ये जनतेचा आमदार म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांना काही विरोधक डाग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. याच विरोधकांनी आ.आबिटकरांनी पुढे जायचे नाही, त्यांना बोलू द्यायचे नाही असा त्यांच्या पार्टीत असताना चंग बांधला होता. मात्र टोपलीत कितीही झाकून ठेवला तरी सुर्य उजाडयाचा थांबत नाही हेच आ.आबिटकर यांनी आपल्या कार्यकुशलतेने दाखवून दिले आहे. विधानसभेतील विधवत्ता पुर्ण भाषणे, जनमाणसांचे, माता भगीनींचे, सर्व सामान्यांचे, विविध संघटनांचे आणि राज्य भरातील विविध प्रश्न मांडून प्रश्नांची सोडवणूक करणारा राधानगरी मतदार संघाचा आवाज राज्यभर पोहचवीला आहे.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, मी नाही आपण सर्वजण निवडणूक लढवत आहात असे समजून सर्वजण कामाला लागले आहेत. मतदार संघात जनतेत जल्लोशी आणि उत्साहाचे वातावरण आहे. अर्ज दाखल करतेवेळी हजारोंची गर्दी प्रत्येक सभेला हजारोंची उपस्थितीत, कोपरा सभा व गावांगावातील पदयात्रेला प्रचंड गर्दी प्रत्येक माणूस मी आमदार होतोय असे समजून सर्वजण कामाला लागले. दहा वर्षातील कामामुळे जनतेत चांगला विश्वास निर्माण झाला आहे. मतदार संघातील रखडलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक, 80 हजार भगिनींना मुख्यमंत्री लाडक्या बहिण योजनेचा लाभ, 13 हजार जेष्ठांना वयोश्री योजनेचा लाभ, 16 हजार शेतकऱ्यांना मोटर पंपाची विज बिले माफ यास मतदार संघातील दीड लाख लोकांना व्यक्तिगत लाभाच्या योजना मिळवून दिला आहे. रोजगार हमी योजनेमध्ये पानंद रस्ते, गाय गोटे, विहिरीची कामे, यासह रोजगार, शिक्षण, सहकार, कृषी, शेतकरी, तरुणांसाठी जो-जो वाच्छींल तो-तो माझे समजून कामे केले आहेत. तालुक्यातील जनतेचे आभार मानावे कसे कळत नाही प्रत्येक व्यापारी, तरुण, शेकडो माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक माझ्या या विकास यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत उच्चांकी मताधिक्य मिळवून इतिहास घडेल असे सांगितले
युवक नेते अमित देसाई म्हणाले, की गद्दारीचे आणि लबाडीचे पाठ लिहायला घेतले तर त्यावर के पी पाटील यांचे पुस्तक नाही तर ग्रंथ तयार होईल अशी परखड टिका करून देसाई म्हणाले, वैचारिक आघाडीची विचार असणारी माणसे एकत्र येत असून के.पी.पाटील यांनी केवळ बिद्रीतुन चिठ्ठ्या देवून मतदार संघात बेरोजगारीचा तांडा निर्माण केला असुन ते रोजगार काय निर्माण म्हणून विद्यमान आमदारांना प्रश्न करतात हे खरोखरच हास्यास्पद असुन त्यांनी दहा वर्षांत या मतदार संघात काय दिवे लावले यांचे उत्तर आधी त्यांनी मतदारसंघातील लोकांना द्यावे असे आवाहन केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, सुर्याजीराव देसाई, युवानेते अमित देसाई, बजरंग देसाई, योगेश परुळेकर, विकास पाटील आदींची भाषणे झाली.
यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले,
कल्याणराव निकम, प्रविणसिंह सावंत, मदनदादा देसाई, सर्जेराव देसाई, वसंतराव प्रभावळे, अशोकराव भांदीगरे, प्रा. दौलतराव जाधव, धौर्यशिल भोसले-सरकार, अंकूश चव्हाण, बी.डी.भोपळे, दिलीप देसाई, सुनिल जठार, अरुण शिंदे यांच्यासह प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन सर्जेराव मोरे, स्वागत व प्रास्तविक दत्तात्रय उगले तर आभार उपसरपंच सागर शिंदे यांनी मानले.
……………………………
निवडणून येणार आमदार प्रकाश……
तुम्हाला पाडायचा नाही विरोधकांमध्ये घास, आम जनतेचा तुमच्यावर आहे विश्वास, येणाऱ्या 23 तारखेला निवडून येणार आमदार प्रकाश असे जोशपुर्ण उद्गार खासदार धैर्यशिल माने यांनी काढताच उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्यांचा एकच जल्लोष करून हुतात्मा चौक दणानून सोडला.
…………………………….
आ. आबिटकर सर्वांत नंबर वन……….
माणूस एक नंबर, काम एक नंबर, मतदान यंत्रावर एक नंबर त्यामुळे आमदार आबिटकरांचा सर्वांत नंबर वनचा सर्व योगायोग जुळून आल्याने आमदार आबिटकर हे एक नंबरच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास खासदार धैर्यशिल माने यांनी व्यक्त केला.
………………………….
तरुणांच्या ह्दयात आमदार आबिटकर……
आमदार प्रकाश आबिटकर यांनी सामान्यांवर नितांत प्रेम केले आहे. तरुणांचे ते आयडॉल आहेत. तरुणांच्यात त्यांची मोठी क्रेझ आहे. त्यामुळेच स्टेटसवर एका बाजुला आई-वडील तर दुसऱ्या बाजुला आ. आबिटकरांची छबी लावतात. हे ऐवढे मोठे भाग्य त्यांच्या कार्यप्रणालीमुळेच मिळाले असल्याचे खा.माने यांनी सांगिले.