स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मदन कारंडे यांनाच पाठिंबा
संघटनेने दिले पत्रक
इचलकरंजीत : महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याआधीच पाठिंबा दर्शवला आहे. तरी शहरामध्ये फेक निगेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न वृत्तपत्रातून करत चुकीची बातमी पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्ष यांनी इचलकरंजी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना याआधीच जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच येथूनही पुढे जाहिरारित्या पाठींबा असणार असे म्हटले आहे. पत्रकात आण्णासाहेब शहापुरे, सतीश मगदूम, संजय बेडक्याळे, हेमंत वणकुंद्रे, अविनाश कोरे, बाळगोंडा पाटील, जयकुमार कोले, पुरंदर पाटील यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
चौकट
विधानसभेला सर्व कारखानदार एकवटले असून स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलने केल्याशिवाय कधीही कारखानदरांकडून उसाला दर दिला जात नाही. सोयाबीन, कांदा, कापसाला बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही. केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे शेताकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला भाव मिळावा म्हणून विधानसभेत आवाज उठविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना निवडून द्या,असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आण्णासाहेब शहापुरे यांनी केले.