मतदार संघाच्या शाश्वत विकासासाठी आणि तुमची कोणतीही व्यक्तीगत अडचण असली तर ही बाबासाहेबांची लेक तुमच्या मदतीला धावून येणार
नंदाताई बाभुळकर यांचे प्रतिपादन
गडहिंग्लज
मोठ्या आशेने आमदारांना निवडून आणलं. स्व. बाबासाहेबांच्या विकासावर पाऊले पडतील, आमचे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले जाणार नाहीत. अशी भोळी समजूत आमची. हा साधा पारदर्शी चेहराच फसवा निघाला. कागदावरचा विकास दाखवला जात आहे. तुम्ही घाबरू नका. तुम्ही निश्चित रहा. मतदार संघाच्या शाश्वत विकासासाठी आणि तुमची कोणतीही व्यक्तीगत अडचण असली तर ही बाबासाहेबांची लेक तुमच्या मदतीला धावून येणार आहे, असे प्रतिपादन चंदगड मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. नंदिनी बाभुळकर यांनी हलकर्णी येथे केले.
. यावेळी बोलताना रामराज कुपेकर म्हणाले, विरोधी नेते लाडक्या बहिणींना आज धमकावण्याचा उद्योग करत आहेत. तुम्ही घाबरू नका. आता १५०० रूपये नव्हे तर आमचे आघाडी सरकार तुम्हाला तीन हजार रूपये देणार आहे. शेतकऱ्यांसाठी ३ लाखांचे कर्ज माफ करणार आहोत. कुटुंबासाठी २५ लाख रूपयांचा आरोग्य विमा आघाडीचे सरकार देणार आहे.
राजू पाटील म्हणाले, गडहिंग्लज पूर्व भागातील पाणी समस्या गंभीर आहे.
येथील ओसाड माळावर डॉ. नंदिनीताई उच्च शिक्षणासाठी कॉलेज उभारतील. बाबांच्या विकासकामाची उतराई आणि विकासाच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ततेसाठी आम्ही डॉ. नंदिनी बाभुळकर विजयी करणार. विशाल शिरूर म्हणाले, आम्ही एकनिष्ठ आहोत. आमचे लोक क्षणिक मोहाला बळी पडणार नाहीत. आप्पासाहेब पाटील म्हणाले, डॉ. नंदिनी बाभुळकरांच्या रूपाने बाबा प्रगट झाले आहेत. वरदशंकर वरदापगोळ म्हणाले, आम्ही आईसाहेबांच्या शब्दाखातर आमदारांना निवडून आणलं. रात्रीचा दिवस करून राबलो. त्याच प्रायश्चित आमच्या पदरात पडलं. आमच्या संस्थेमध्ये लुडबूड करून नाहक त्रास दिला. यावेळी बाळेश नाईक, श्रीशैल गोटुरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होता.