बाबांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची ही वेळ अमर चव्हाण यांचे प्रतिपादन नंदाताई बाबुळकर यांना विजयी करण्याचे आवाहन

Spread the news

बाबांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची ही वेळ

अमर चव्हाण यांचे प्रतिपादन

नंदाताई बाबुळकर यांना विजयी करण्याचे आवाहन

गडहिंग्लज

चित्री सारख्या प्रकल्पाने हरित क्रांती घडवली. शंभर कॉटच्या उपजिल्हा रुग्णालयाने तीन तालुक्यातील गरिबांचे आरोग्य सांभाळले. प्रत्येक गावाचा, घराघरांचा विकास केला. त्या स्व. बाबांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची ही वेळ आली आहे. एखाद्याच्या बाबाने घर बांधले तर मुले विसरत नाहीत. मग आमचे संसार फुलवले त्या स्व. बाबांना कोण विसरेल असे उद्‌गार राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह चव्हाण यांनी केले.

चव्हाण पुढे म्हणाले, स्व. बाबासाहेब गडहिंग्लजकरांच्या विकासाचे धनी आहेत. भडगाव पंचक्रोशीसह बाबांनी उभी हयात जनतेची सेवा केली आहे. शरद पवार यांनी महिला आरक्षण आणून महिलांना सन्मान मिळवून दिला. देशातील तमाम शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. राजू शेट्टी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी उसाला चारशेचा भाव होता. तो तीन हजार दिला. त्यांना विसरू नका. तुमच्या आमच्या भविष्यासाठी डॉ. नंदिनी बाभुळकर यांना विजयी करण्याची खूणगाठ पक्की करा.

आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदिनी बाभुळकर यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. डॉ. नंदिनी बाभुळकर-कुपेकर म्हणाल्या, आमचा गडहिंग्लज, आजरा, चंदगड वाचवायचा आहे. एक प्रकारची निष्क्रीयता आणि दहशत येथे नांदत आहे. प्रतिस्पर्धी

उमेदवारांचे अवलोकन करा. त्यांना पुन्हा निवडून दिलात तर घात होईल. आज विकासाची मोठी स्वप्नं घेऊन मी आली आहे. मला सेवा करण्याची संधी द्या. बाबासाहेब गेल्याने विकासाची आणि आपल्या जिव्हाळ्याची फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हे नातं पुन्हा प्रेमाने घट्ट करूया. आरोग्य, शेती, शिक्षण, दळणवळण, जलपरिवर्तन, महिला सक्षमीकरण, पर्यटन, कला, साहित्य, दिव्यांग सर्वच क्षेत्रात मला शाश्वत विकास करायचा आहे. हे माझे नुसते स्वप्न नाही तर हेच माझे उर्वरित जीवन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना रामराज कुपेकर यांनी नंदिनी बाभुळकर यांचा विजय म्हणजे या मातीचा विजय ठरणार असल्याचे सांगितले. रियाजभाई समनजी यांनी मनोगत व्यक्त केले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!