पन्नास खोके एकदम ओके… वाले हे महायुतीचे सरकार सत्तेतून पाय उतार होईल; मल्लिकार्जुन खर्गे
एक सक्षम आणि स्थिर सरकार आम्ही महाराष्ट्र राज्यात देऊ….
कोल्हापूर ता १७:- पन्नास खोके एकदम ओके… वाले हे महायुतीचे सरकार आता सत्तेतून पाय उतार होईल. एक सक्षम आणि स्थिर सरकार आम्ही महाराष्ट्र राज्यात देऊ. असा विश्वास, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ते आज कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी, राज्यातील महायुतीचे सरकार जाईल आणि , महाविकास आघाडी सत्तेत येईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निमित्ताने, मराठावाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई या ठिकाणी मी गेलो आहे, या ठिकाणी जनतेचा चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
महायुती सरकारला जनता कंटाळली आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी, मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजूनही निश्चित नाही. प्रचारासाठी थोडाच वेळ शिल्लक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार यावर बोलून वेळ वाया घालवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतील सर्व नेते मिळून आम्ही मुख्यमंत्री ठरवू. आमच्यात कोणताही वाद नसणार आहे. असंही त्यांनी सांगितलं. शिवाय
भाजपला हरवण्यासाठी आम्ही एक झालो आहोत. नवीन सरकार आणण्यासाठीच आम्ही एक झालो आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार बनवताना कोणतीही अडचण येणार नाही. महाराष्ट्रात आमचे सरकार बनवणार, राज्यातल्या जनतेला नवीन सरकार आम्ही देणार. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणताही घोडेबाजार होणार नाही. ज्यांना आम्ही संधी दिली आहे ते कुठेही जाणार नाहीत.. खोके सब ओके भी नही है.. असा टोलाही त्यांनी, महायुती आघाडीला लगावला..उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्रात प्रचार करत फिरत आहेत . मात्र उत्तर प्रदेश मधील रुग्णालयात लहान मुलांचा जीव जात आहे मणिपूरमध्ये लोकांना मारलं जात आहे. जाळलं जात आहे. लहान मुलं देखील त्या ठिकाणी मरत आहेत. अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
आम्ही देखील, खूप निवडणुका पाहिल्या आहेत. मात्र ,राज्यस्तरावरील निवडणुकासाठी कधी आम्ही गेलो नाही. मात्र, या ठिकाणी पंतप्रधान आलेत. देशाचे केंद्रीय गृहमंत्री आलेत. ही निवडणूक महाराष्ट्र राज्यातील आहे. या ठिकाणची जनता या ठिकाणचा निर्णय घेईल..मात्र राज्य स्तरावरील निवडणुकासाठी आम्ही कधी गेलो नाही. पंतप्रधान यांनी प्रथम देशातील जनतेसाठी काम करावं. त्यांना जनतेने पंतप्रधान बनवले आहे.
असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशावर देशावर प्रेम नाही. जनतेच्या समस्या सोडवण्याचा, पंतप्रधान मोदी यांचे कडे काही उपाय नाही. जनतेचे देशाचं काहीतरी भलं करण्यासाठी तुम्हाला जनतेने निवडले आहे. मात्र पंतप्रधान
सत्ता वाचवण्यासाठी आता तालुका पातळीवर देखील जात आहेत. अशी टिकाही त्यांनी केली. पंतप्रधान मोदींची खुर्ची, सुरक्षित नाही. लोकसभेत त्यांना कमी जागा मिळाल्या. केंद्रातील सरकार स्थिर नाही. असंही त्यांनी सांगितलं.
लोकांना धमकवलं जात आहे. त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. ईडी, सीबीआयची भिती दाखऊन, पक्ष फोडले गेले. मात्र आम्ही, महाराष्ट्राला एक चांगलं स्थिर सरकार देऊ असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, कर्नाटकचे आमदार हसन मौलाना, माजी आमदार अंजली निंबाळकर, कोल्हापूर उत्तर विधानसभेचे निरीक्षक सुखविंदर ब्रार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक तोफिक मुल्लानी, बाळासाहेब सरनाईक, संध्या घोटणे, सरलाताई पाटील, भारती पोवार आदी उपस्थित होते.