खानविलकर गटाचा महायुतीला पाठिंबा
राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग
कोल्हापूर
माजी मंत्री कै. दिग्विजय खानविलकर यांच्या पत्नी श्रीमती राजलक्ष्मी खानविलकर, सुपुत्र विश्वविजय खानविलकर यांनी खानविलकर गटाच्या वतीने महायुतीच्या सर्वच उमेदवारांना पाठींबा दिला.
आज शनिवार पेठ येथील प्रचार फेरी दरम्यान श्रीमती राजलक्ष्मी खानविलकर, सुपुत्र विश्वविजय खानविलकर यांनी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून पाठींबा दिला व प्रचारात सक्रीय झाले.
यावेळी राजेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी खानविलकर गट सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे विश्वविजय खानविलकर यांनी सांगितले.