*
विरोधकांचे आरोप निराधार व बालिशपणाचे
राहुल पाटील
कुडित्रे येथील जाहीर सभेत टीका
मल्ल बजरंग पुनियाची उपस्थिती
कोपार्डे
करवीर मधील विरोधक माझी व मुख्यमंत्र्यांची ओळख नाही असा कांगावा करत आहेत .पराभवाच्या भीतीने पाया खालची वाळू घसरल्यामुळे ते बालिशपणाने निराधार आरोप करत असून मलाही बोलता येते मात्र माझ्यावर पी एन पाटील यांचे संस्कार आहेत .त्यामुळे मी पातळी सोडून बोलणार नाही करवीरची जनताच त्यांना या आरोपांची उत्तर देईल अशी घणाघाती टीका करवीर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांनी केली.मला जनसेवेची संधी द्या संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी वाहीन असे आवाहनही त्यांनी केले .
कुडित्रे (ता.करवीर) येथील जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते सभेच्याअध्यक्षस्थानी संभाजी रघुनाथ पाटील होते.आपल्या भाषणात पुढे बोलताना स्वर्गीय पी .एन पाटील यांनी गेली 40 वर्षेया मतदारसंघातील वाडी वस्तीवरील प्रत्येक कार्यकर्ता हा माझा आहे असे समजून आपले आयुष्य वाहिले आहे .त्यांचे अपुरे कार्य पूर्ण करण्यासाठी मला तुमचा भाऊ मुलगा म्हणून संधी द्याआयुष्यभर तुमची सेवा करीन असे पाटील यांनी सांगितले .
यावेळी बोलतानाअखिल भारतीय किसान काँग्रेसचेअध्यक्ष व सुप्रसिद्ध मल्ल बजरंग पुनिया यांनी महाराष्ट्रातील क्रीडा व कुस्ती क्षेत्राच्या विकासासाठी महाविकास आघाडीला सत्ता देणे गरजेचे असून राहुल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे सांगितले .
शिवसेनेचे रविकिरण इंगवले यांनी आयुष्यात कुणालाही राजकीय उपद्रव न देणारे नेते स्व.आमदार पी.एन.पाटील साहेब आणि त्यांचे कुटुंब आहे. सत्ता आणि स्वार्थासाठी मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांना यांच्याशी गद्दारी करणाऱ्या गद्दाराला पराभूत करून विकासाचे व्हिजन घेऊन आपल्यासमोर आलेले राहुल पाटील यांना विजयी करण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक जीवाचे रान करुन विजयश्री खेचून आणतील.
यावेळी बोलताना क्रांतीसिंह पवार पाटील म्हणाले, शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत विरोधी उमेदवार नरके यांच्याकडून खोट्या अफवा पसरवून दिशाभूल होत आहे. अशा लबाड माणसाच्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. राहुल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजय करूनच याचे उत्तर देऊ असे सांगितले
यावेळी डी.जी.भास्कर
राजेंद्र सुर्यवंशी, शिवाजीराव कवाळे, संभाजीराव पाटील, बाजीराव देवाळकर, अमर पाटील, आकाश भास्कर, विष्णू राऊत, धीरज पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी व्यासपीठावर प्रा.टी.एल.पाटील, संभाजी पाटील तात्या, विष्णू हरणे, सरदार मुल्लानी, संजय दिंडे, रघुनाथ शेलार, भगवान देसाई, सरदार पाटील,अक्षय पवार पाटील, अमित कांबळे, उपसरपंच भारती पाटील, उर्मिला पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटोकॅप्शन
कुडित्रे येथील जाहीर सभेत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर व रविकिरण इंगवले समोर उपस्थित जनसमुदाय