*
बंकट थोडगें चा शिवसेनेला जय महाराष्ट्र
अनेक गावातील कार्यकर्त्यांचा राहुल पाटील यांना जाहीर पाठिंबा
विरोधकांना धक्का
कोल्हापूर :
गगनबावडा पंचायत समितीचे चे माजी सभापती बंकट थोडगे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे .मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील सडोलीकर यांना मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी पाठिंबा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे विरोधकांना जबरदस्त धक्का बसला आहे. भामटे माजनाळ किरवे कुडित्रे माजगाव दोनवडे यासह अनेक गावातील शिवसैनिका सह तरुण मंडळे सामाजिक संघटनानी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे .त्यामुळे राहुल पाटील यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे .
गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करून राहुल पाटील यांना विजयी करण्याचा वज्रनिर्धार केला आहे .
भामटे (ता.करवीर) येथील अजित पाटील, संदीप खाडे, युवराज पाटील,भरत पाटील, नामदेव पाटील, रणजीत पाटील, कार्तिक पाटील, विजय तवार, अस्तिक पाटील, पांडुरंग तवार, सागर साळोखे, विक्रम पाटील, ओंकार पाटील, संग्राम पाटील, गजानन पाटील, उत्तम मगदूम आदी नरके गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
नागदेववाडी (ता. करवीर) येथील जय भवानी कॉलनीतील प्रमोद पानारी, श्रीकांत सावंत, अक्षय कदम, नितीन पोवार, संदीप भगले, शुभांगी सावंत, वंदना कदम, जयदीप भोसले, विनायक खोत, सौरभ वरुटे, नितीन नागवेकर, हिंदुराव पाटील, संदीप कदम, दिनेश मोटे, मंगेश गुरव, प्रशांत शिंदे आदी नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला. निगवे येथील यंग स्टार क्रीडा मंडळाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
कुडीत्रे येथील सभेत राजाराम संपती पाटील (कुडीत्रे) तसेच सुळे (ता. पन्हाळा) येथील राऊ पाटील, तुकाराम पाटील, तुषार पाटील, भरत पोतदार, उत्तम सुतार, बाळू पाटील, कुमार पाटील, कृष्णात पाटील, मारुती पाटील, सौरभ वाकरेकर, संदीप बुरुड यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला.
माजनाळ (ता. पन्हाळा) येथील सुवर्णा सह. दूध संस्थेचे चेअरमन जोतिराम पाटील, व्हा.चेअरमन नाथाजी वाकरेकर, संचालक जोतिराम भाकरे, विलास पोवार, माजी उपसरपंच बंडोपंत पाटील, कृष्णात मरळकर, परशुराम पाटील, माजी सरपंच तानाजी पाटील, बळीराम मगदूम, अजित पाटील (शिवसेना), शंकर पाटील, अक्षय जाधव(उपाध्यक्ष सारथी फौंडेशन), कृष्णात पाटील (संचालक धरण सोसायटी) आदीनी जाहीर पाठिंबा दिला.
किरवे (ता.गगनबावडा) येथील विवेक पाटील , अजित कदम , इंद्रजित पाटील ,चंदर पाटील , करण पाटील, रणजित पाटील, जयदीप जाधव, गणेश काळोखे, शरद गावडे, श्रेयस पाटील, संकेत पाटील, रवींद्र कांबळे ,प्रतीक चव्हाण , पराग कांबळे आदी संयुक्त क्रिडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. बहुजन समाज विकास परिषदेने जातीयवादी व धर्मांध शक्तीना रोखण्यासाठी व संविधान रक्षणासाठी राहुल पाटील यांच्या हाताला जाहीर पाठिंबा दिला.
—————
चौकट :
तुमच्यासाठी कायम उभा असेन..
पक्षप्रवेश व जाहीर पाठिंबा देणाऱ्या शेकडो कार्यकर्ते, संस्था, सामाजिक संघटना, तरुण मंडळे यांनी निवडणुकीत शंभर हत्तीचे बळ दिले आहे.तुम्ही आम्हाला साथ दिली आहे आम्ही जन्मभर तुमच्या पाठीशी राहू असा विश्वास राहुल पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी दिला.