चंदगडच्या माफीया राजला कोणाचा आशिर्वाद ?
डॉ. नंदिनी बाभुळकर-कुपेकर यांचा सवाल
चंदगड
चंदगडमध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. तस्करी मोठ्या प्रमाणात चालली आहे. प्रशासनाला मोकळीक दिली आहे. त्यांना कोणाचा आशिर्वाद आहे ? कोण आहे त्यांच्या पाठिशी ? सूज्ञ जनतेने समाजातील अनिष्ठ प्रवृत्ती हाणून पाडावी. चंदगड येथे माफीया राज चालू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदिनी बाभुळकर- कुपेकर यांनी केला.
चंदगड, हेरे, कोळींद्रे, सुळये येथील प्रचार दौऱ्यात त्या कॉर्नर सभेत बोलत होत्या.
डॉ. बाभुळकर पुढे म्हणाल्या, मतदार संघातील रस्त्यांची चाळण झाली आहे. प्रवास करताना शरीराची हाड खिळखिळी होत आहेत. शिनोळी, चंदगड, कानूर रस्त्यात अपघातांची मालिका दररोज चालू आहे. आजपर्यंत ३५ तरूणांनी आपले प्राण गमवले. हे कार्यसम्राटांना दिसत नाही का ? शरद पवार यांच्यावरती विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले. त्या प पवारांच्या पाठीत खंजूर खूपसून हे पळून गेले.
चंदगड येथील कॉर्नर सभेत बोलताना डॉ. नंदिनी बाभुळकर-कुपेकर. शेजारी रामराज कुपेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला आदी मान्यवर
” विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करून घेतला. आता चंदगड मतदार संघातील सुज्ञ जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विलास भावकू पाटील म्हणाले, चंदगड तालुक्यातील आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, काँग्रेस, उबाठा शिवसेना एकसंघ आहेत. पूर्ण शक्तीनिशी आम्ही ही लढाई जिंकणार आहे. चंदगड तालुक्यात एक नंबरची मते आम्ही मिळवून देऊ. माजी जिल्हा
परिषद सदस्या विद्या पाटील यांच्या कार्याने तुडये, माणगाव, तुर्केवाडी मतदार संघात गावागावात विकास आम्ही पोहचवण्यात यशस्वी झालो असल्याचे सांगितले. यावेळी रामराज कुपेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, राजेंद्र परीट, संतोष हळदणकर, सिंकदर नाईक, अल्ताफ मदार, अशोक दाणी, अकबर बेपारी, रजाक बेपारी, सल्लाउद्दीन नाईकवाडी, शब्बीर बेपारी, हसन बेपारी, अरीफ खेडकर, राहुल धुपदाळे, सुद्यान धुपदाळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.