विकासकामांचे चौफेर व्हिजन असलेल्या समरजितसिंह राजेंना निवडून देऊया : ॲड.एम.जे. पाटील……. बार असोसिएशनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करू : राजे समरजितसिंह घाटगे…..

Spread the news

विकासकामांचे चौफेर व्हिजन असलेल्या समरजितसिंह राजेंना निवडून देऊया : ॲड.एम.जे. पाटील…….

बार असोसिएशनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करू : राजे समरजितसिंह घाटगे…..

कागल / प्रतिनिधी

लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचे आचार आणि विचार राजे समरजितसिंह घाटगे यांनी आत्मसात करून प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी ते सिद्ध केले आहेत.अल्पावधीतच त्यांनी कोणतेही संविधानिक पद नसताना देखील मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांसाठी विकासनिधी खेचून आणलेला आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत अभ्यासू ,निष्कलंक, व्यासंगी आणि विकासाचे व्हिजन असलेले चौफेर नेतृत्व आहे.अशा सर्वगुणसंपन्न नेतृत्वाच्या पाठीशी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत ठामपणे उभे राहून त्यांना निवडून देऊया असे प्रतिपादन कागल तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एम.जे.पाटील यांनी केले.

येथील कागल तालुका बार असोसिएशनला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांनी भेट दिली त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ॲड. पाटील पुढे म्हणाले, राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे चिकोत्रा, आंबेओहोळ प्रकल्प पूर्ण झाले आहेत.राजेंचे शिक्षणाबाबतचे व्हिजन देखील खूप प्रेरणादायी आहेत. त्यांच्या अभ्यासू नेतृत्वाखाली स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी उभारलेल्या सर्वच संस्था शिखरावर नेऊन पोहचवण्याचे काम त्यांनी केले आहे. विशेष म्हणजे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. अशा बहुआयामी नेतृत्वाच्या पाठीशी येत्या निवडणुकीत राहूया..

राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,आपल्या देशातील आदर्शवत लोकशाहीचा कारभार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतून अवतरलेल्या संविधानातून सुरू आहे.मात्र कांही मंडळी संविधानावरती हात ठेवून असंविधानिक विधाने करत आहेत. हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव आहे.त्यामुळे आपल्या सर्वांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून येत्या निवडणुकीत माझ्या पाठीशी राहून आम्हाला साथ द्या. येत्या काळात बार असोसिएशनच्या प्रलंबित असलेल्या सर्वच मागण्या सोडविण्यासाठी आपण नक्की प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली .

यावेळी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.बी.बी.मगदूम, ॲड.एस.के.पोटले, ॲड.सुरेश कुराडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ॲड.संभाजी दावणे, ॲड.प्रमोद हावलदार, ॲड.सुधीर सावर्डेकर, ॲड.गणेश चौगुले,ॲड.महादेव गोरडे,ॲड.मीनाक्षी जाधव- शिरसाट, ॲड .वैभव गोरडे, ॲड.आर.डी मगदूम,ॲड.मनोज माने यांच्यासह बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते…

स्वागत प्रास्ताविक ॲड.अभिजीत सांगावकर यांनी केले. ॲड.संभाजी दावणे यांनी आभार मानले….

 

 

चौकट ————–
परिवर्तनाचे नाव राजे समरजितसिंह
घाटगे……….

यावेळी बोलताना ॲड.वीरश्री जाधव म्हणाल्या,राजे समरजितसिंह घाटगे यांचे आचार-विचार आणि संस्कार हे खूपच प्रेरणादायी आहेत. शाहू महाराजांचे संस्कार तर ते तंतोतंत कृतीतून सांभाळत आहेत.विकासाचे त्यांच्याकडे चांगले व्हिजन आहे.अल्पावधीत जनसामान्यांच्या हृदयात विराजमान झालेले ते नेते आहेत. त्यामुळेच आज तालुक्यामध्ये बदलाचे, परिवर्तनाचे वारे वाहत असून त्या बदलाचे, परिवर्तनाचे नाव केवळ आणि केवळ राजे समरजितसिंह घाटगे हेच आहेत असे सांगितले..

छायाचित्र ——–

कागल बार असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना बार असोसिएशनचे अध्यक्ष एम.जे.पाटील,राजे समरजितसिंह घाटगे…..


Spread the news

You may also like

error: Content is protected !!