*छ.शिवरायांच्या पुतळा कामास नकार देणा-या महाडिकांना मते का द्यायची : पांडुरंग महाडेश्वर*
कोल्हापूर, ता.15 : निगवे खालसा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक, खा.धनंजय महाडिक व शौमिका महाडिक यांचेकडे गेलो असता त्यांनी या कामासाठी नकार दिला. मात्र आमदार सतेज पाटील यांनी लोकवर्गणीतून उभारल्या जाणा-या छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास परवानगी मिळवून ते काम पूर्ण करण्यासाठी मदतही केली. छ. शिवरायांच्या पुतळा कामास नकार देणा-या महाडिकांना मते का द्यायची? असा सवाल माजी सरपंच पांडुरंग महाडेश्वर यांनी केला. महाडिकांनी 40 वर्षे केवळ आमचा वापर करुन घेतला अशी टीकाही त्यांनी केली. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ निगवे खालसा येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार सतेज पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षात आ.ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात भरीव काम केले आहे. कोणीही काम घेऊन आले तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. सर्वसामान्यांमध्ये मिसळून कामे करणारा आमदार तुम्हांला मिळाला आहे. ऋतुराज पाटील हे आमचे आमदार आहेत हे तुम्ही अभिमानाने सांगू शकता.
बाजार समिती संचालक सुयोग वाडकर म्हणाले, आ.ऋतुराज पाटील यांचे नाणे खणखणीत आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ओबीसी संघटनेने आमदार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा जाहिर केला.
पश्चिम महाराष्ट्र काँग्रेसचे पक्ष निरीक्षक काझी, गोकूळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, एकनाथ पाटील, बाळासाहेब पाटील, श्रीपती पाटील, बच्चाराम किल्लेदार, सरपंच ज्योती कांबळे, उपसरपंच शिवाजी पाटील, एल. एस. किल्लेदार, जी. जी. पाटील, जगदीश चौगले, सागर पाटील, अशोक किल्लेदार, पी एम. पाटील, गजानन पाटील, जयवंत घाडगे, एस. बी. पाटील, संदीप तवंदकर, श्रीकांत पाटील, आर. एस. कांबळे, पोपट कांजर, शहाजी किल्लेदार, अशोक पाटील, सदाशिव पोतदार, सुवर्णा गुरव, सुजाता सुतार, सतपाल मगदूम, विलास साठे आदि उपस्थित होते.
चौकट :
*जनताच किंगमेकर*
तुमच्या सर्वांच्या पाठबळावर आजपर्यंत मी संघर्षातून यश मिळवू शकलो. तुमच्यामुळेच मला राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाली. मी नाही तर तुम्ही सर्वजण ख-या अर्थाने किंगमेकर आहात. जसे मला पाठबळ दिले तसेच भक्कम पाठबळ ऋतुराज यांनाही द्या असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
फोटो ओळी : निगवे खालसा येथील प्रचारसभेत बोलताना पांडुरंग महाडेश्वर, व्यासपीठावर आमदार सतेज पाटील व अन्य.